आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

पावसाळ्यापूर्वी डासांसारख्या कीटकांपासून पसरणाऱ्या आजारांच्या प्रतिबंधासाठी आणि नियंत्रणासाठी राज्यांच्या सज्जतेचा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतला आढावा


राज्यांनी अंतर्गत तयारीचा आढावा घ्यावा आणि प्रतिबंधात्मक उपायांसाठी जनतेमध्ये जागरूकता वाढवण्याचे केले आवाहन

Posted On: 30 JUN 2023 8:22PM by PIB Mumbai

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, काला आझार आणि जापानी एन्सेफलायटीस यांसारख्या डासांसारख्या कीटकांपासून पसरणाऱ्या रोगांच्या पावसाळ्याच्या आधी प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राज्यांच्या तयारीचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आढावा घेतला. यावेळी सिक्कीमचे मुख्यमंत्री, 22 राज्यांचे आरोग्य मंत्री, प्रा. सचिव (आरोग्य), राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक (MD NHM) आणि राज्यांतील वरिष्ठ अधिकारी या आढावा बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीला आरोग्याने कुटुंब कल्याण मंत्रालयाचे(MoHFW) विशेष कर्तव्य अधिकारी सुधांश पंत हे देखील उपस्थित होते.

यावेळी आवश्यक ती तयारी आणि संयुक्त प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, " आपण आरोग्यविषयक गरजांची पूर्वतयारी करून आणि वेळेपूर्वी त्यांच्यासाठी पुरेशा तरतुदी करून अशा आजारांचा भार प्रभावीपणे कमी करू शकतो."

आरोग्यासंबंधीच्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी राज्यांनी आपल्या आरोग्य विषयक तरतुदींचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन डॉ. मनसुख मांडविया यांनी केले. वेळीच जर प्रतिबंधात्मक उपाय लागू केले तर आजारांचा प्रसार कमी होतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ. मांडविया यांनी, राज्यांना डासांचे प्रजनन रोखण्यासाठी आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी, समुदायाच्या एकत्रित प्रयत्नांबरोबरच तसेच जागरूकता निर्माण करण्याबरोबरच, राज्यांमध्ये अंमलात आणल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट पद्धती आणि सार्वजनिक आरोग्याच्या नाविन्यपूर्ण उपाययोजना सामायिक करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी वर्तणुकीशी संबंधित मोहिमा तसेच गावे, शाळा आणि परिसरात माहिती, शिक्षण, संवाद वाढवण्याच्या आणि त्याचा प्रसार करण्याच्या कामी जनतेला एकत्र येण्याचे करण्याचे आवाहन केले.

आयईसी/ सामाजिक मोहिमांच्या माध्यमातून या आजाराच्या रुग्णांबाबत सूचना, अशा रोग्यांची काळजी आणि या कामी सामुदायिक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आयुष्मान भारत-आरोग्य आणि वेलनेस सेंटर्सचा समावेश करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्यांना दिला. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी, राज्यांना आवश्यक सर्व ती मदत यात औषध/निदान तसेच राज्यांनी निर्दिष्ट केलेल्या इतर आवश्यक संसाधनांची वेळेवर उपलब्धता आणि प्रभावी वितरण होईल, अशी हमी दिली.

***

Radhika A/VikasY/CYadav

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/Twitter-iconI0HR.jpg

(Release ID: 1936594) Visitor Counter : 114