अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वतीने आज नवी दिल्ली येथे "वर्ल्ड फूड इंडिया-2023" च्या तयारीसाठी दुसऱ्या आंतर-मंत्रालयीन समितीच्या बैठकीचे आयोजन
अन्न प्रक्रिया क्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकास, व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुकूल व्यवस्थेच्या विकासासाठी संबंधित मंत्रालये आणि विभागांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर यावेळी देण्यात आला भर
Posted On:
30 JUN 2023 7:17PM by PIB Mumbai
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने आज नवी दिल्ली येथील विज्ञान भवन ॲनेक्स येथे वर्ल्ड फूड इंडिया-2023 च्या तयारीसाठी दुसरी आंतर-मंत्रालयीन समितीची बैठक आयोजित केली होती. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मिन्हाज आलम यांनी मंत्रालय/विभाग/ग्राहक मंडळांच्या वरिष्ठ प्रतिनिधींसोबत झालेल्या या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले. या बैठकीत केंद्र सरकारच्या प्रमुख मंत्रालये आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभाग झाले होते.
सर्व सहभागींना 3 ते 5 नोव्हेंबर 2023 दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या वर्ल्ड फूड इंडिया-2023 च्या तयारीतील घडामोडींची माहिती देण्यात आली. मे 2023 मध्ये समिती सदस्यांशी झालेल्या संवादाच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
अन्नप्रक्रिया मंत्रालयाच्या (FPI)अतिरिक्त सचिवांच्या पुढाकाराने झालेल्या चर्चेत, पायाभूत सुविधांचा विकास, व्यापार आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रात गुंतवणूक प्रोत्साहन देण्यासाठी अनुकूल व्यवस्थेच्या विकासामध्ये संबंधित मंत्रालये आणि विभागांच्या असलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर यावेळी भर देण्यात आला. सर्व केंद्रीय मंत्रालये आणि विभागांनी आपापल्या प्रदर्शनाची जागा/स्टॉल, तांत्रिक सत्रांमधील सहभाग तसेच कार्यक्रमाच्या रिव्हर्स बायर सेलर मीटमध्ये सहभाग याद्वारे कार्यक्रमातील त्यांच्या सहभागाविषयी आपली स्वीकृती दर्शवली. सहभागी अधिका-यांनी खरेदीदार विक्रेता संवाद, स्टार्टअप्सशी संलग्नता, विशेष आयुष उत्पादनांची जाहिरात, एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) आणि भौगोलिक स्थाननिर्देशांक(GI) उत्पादने असे उपक्रम यशस्वी करण्यासाठी काम करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत अधिका-यांनी निर्यातदार आणि खरेदीदारांच्या सहभागाबद्दल तसेच विविध संघटनांनी हाती घेतलेल्या पुढील कार्याबद्दलची माहिती दिली.
***
R.Aghor/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1936567)
Visitor Counter : 117