राष्ट्रपती कार्यालय

ईद-उज-जुहाच्या पूर्वसंध्येला भारताच्या राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा

Posted On: 28 JUN 2023 7:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 जून 2023

 

भारताच्या राष्ट्रपती श्रीमती. द्रौपदी मुर्मू यांनी ईद-उज-जुहाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

“ईद-उज-जुहा निमित्त मी सर्व देशवासीयांना, विशेषत: भारत आणि परदेशात राहणाऱ्या आपल्या मुस्लिम बांधवांना आणि भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा देते,असे राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे. 

ईद-उज-जुहा हा प्रेम आणि त्यागाचा पवित्र सण आहे. हा सण आपल्याला त्यागाचा मार्ग अवलंबण्याची आणि मानवतेची निस्वार्थ सेवा करण्याची प्रेरणा देतो.

या दिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण समाजात परस्पर बंधुभाव आणि सौहार्द वाढविण्याचे कार्य करण्याची शपथ घेऊ या."

राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

 

* * *

S.Tupe/S.Pargaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1936048) Visitor Counter : 115