सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

हेलन केलर दिवस 27 जून रोजी साजरा

Posted On: 27 JUN 2023 5:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जून 2023

 

हेलन केलर यांच्या जन्मदिनी दरवर्षी 27 जून रोजी हेलन केलर  दिवस  साजरा केला जातो. हेलन केलर जन्मतः कर्णबधिर आणि अंध होत्या, तरीही त्यांनी जीवनात जिद्द-चिकाटी ठेवली आणि आपले ध्येय साध्य केले.  त्या प्रसिद्ध लेखिका बनल्या. अनेक पुस्तके प्रकाशित केली, "अमेरिकन फाउंडेशन फॉर द ब्लाइंड" ची स्थापनाही केली आणि दिव्यांग व्यक्तींची  बाजू त्यांनी लावून धरली. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे, अंध आणि कर्णबधिर आपले जीवन परिपूर्ण आणि सफल  जगण्यास सक्षम आहेत. दिव्यांग व्यक्तींना पाठबळ देणे आणि त्यांना सामावून घेण्यात केलेल्या प्रगतीची दखल आपण हेलन केलर दिवसानिमित्ताने घेतो. प्रत्येकाकडे क्षमता असते आणि ते समाजासाठी खूप योगदान देऊ शकतात याची आठवण यामुळे जागी राहते.

केंद्र  सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालया अंतर्गत दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग  देशातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्व विकास कार्यक्रमांवर लक्ष ठेवणारी प्रमुख (नोडल) संस्था आहे. हेलन केलर यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने आणि संबंधितांना विशेषत: दिव्यांगजनांना प्रेरित करण्यासाठी, विभागाने 27 जून 2023 रोजी हेलन केलर दिवस साजरा केला.  सहयोगी  संस्थांनी यानिमित्ताने देशभरात 50 हून अधिक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले.

हेलन केलर दिवस 27 जून 2023 रोजी साजरा करण्यात आला. या निमित्ताने जनजागृती कार्यक्रम, परिसंवाद आणि कार्यशाळा, संस्थेच्या कम्युनिटी रेडिओ स्टेशन 91.2 NIVH हॅलो दूनद्वारे दृक् श्राव्य कार्यक्रम, वेबिनार, क्रीडा उपक्रम, प्रश्नमंजुषा स्पर्धा देशभरात आयोजित करण्यात आल्या होत्या.

 

* * *

S.Kakade/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1935666) Visitor Counter : 117