गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
जगातील सर्वात मोठ्या आठव्या शहरी स्वच्छता सर्वेक्षणाला सुरूवात
Posted On:
27 JUN 2023 4:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जून 2023
जगातील सर्वात मोठ्या आठव्या शहरी स्वच्छता सर्वेक्षण, स्वच्छ सर्वेक्षण 2023 – माझे शहर, माझी ओळख याची तयारी पूर्ण झाली आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने (MoHUA) स्वच्छ सर्वेक्षण (SS) 2023 साठी प्रत्यक्ष मूल्यांकनाची सुरुवात केली आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत, 1 जुलै 2023 पासून अंदाजे 3,000 निरिक्षक मूल्यांकन करायला सुरुवात करतील. ते 4500+ शहरांच्या कामगिरीचा 46 निकषांवर अभ्यास करतील. हे मूल्यांकन महिनाभरात पूर्ण होणे अपेक्षित आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2023 चॅम्पियन कचऱ्यापासून संपत्ती हे कचऱ्यावर प्रक्रिया तसेच वैज्ञानिक व्यवस्थापनासाठी तयार केले आहे. याची सुरुवात 24 मे 2022 रोजी झाली होती.
स्वच्छ सर्वेक्षण 2023 साठी नवीन तिसऱ्या तिमाहीला या वर्षी प्रारंभ झाला. राज्ये/शहरांनी यासाठीची आपली तयारी वाढवून ते सर्वेक्षणासाठी सज्ज झाले. देशभरातील गेल्या दोन महिन्यांतील तीव्र उष्णतेचा कालावधी टाळून, आता 1 जुलै 2023 पासून चौथ्या तिमाहीची सुरुवात होत आहे.
स्वच्छ सर्वेक्षण 2023 च्या चौथ्या आणि अंतिम तिमाहीच्या मूल्यांकनाचा शुभारंभ MoHUA सचिव मनोज जोशी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केला. “स्वच्छ सर्वेक्षणाची मागील 7 वर्षे स्वच्छ भारत अभियानाचे वैशिष्ट्य राहिले आहे. ते यावर्षीही कायम ठेवायचे आहे. आम्ही लहान आणि मध्यम आकाराच्या शहरांसाठी ते सुलभ आणि उपयुक्त बनवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. जेणेकरून स्वच्छ सर्वेक्षण हे स्वच्छता सुधारण्यासाठी एक व्यवस्थापन साधन म्हणून चालू राहील असे ते म्हणाले. मॅनहोलचे मशीन होलमध्ये रूपांतर करण्यावर भर देत, सफाईमित्र सुरक्षाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. कचरा प्रक्रियेवर बोलताना त्यांनी कचरा निर्माण होतो तिथेच त्याचे विलगीकरण करण्याच्या गरजेवर भर दिला. सर्वेक्षणामुळे स्वच्छतेच्या बाबतीत शहरे अधिक चांगले होण्यासाठी प्रेरित होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
घरोघरी कचरा गोळा करणे, शून्य कचरा कार्यक्रम, दिव्यांगांसाठी अनुकूल शौचालये, सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि घरांमागील नाले स्वच्छ करणे या बाबींवर स्वच्छ सर्वेक्षण 2023 च्या निकषांमधे लक्ष केंद्रित केले आहे. यावर्षी त्यात गुणही वाढवले आहेत.
स्वच्छ सर्वेक्षणाने शहरांंमधे बदल आणि परिवर्तनाचे मार्ग खुले केले आहेत. आता हे एक प्रेरक साधन बनले असून राज्ये/शहरांसाठी अभिमानाची बाब म्हणून ओळखले जात आहे. कचरामुक्त शहरे निर्माण करण्याच्या उद्देशाने, बदल घडवून आणण्याची हीच वेळ आहे.
* * *
S.Tupe/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1935605)
Visitor Counter : 362