जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बनावट संकेतस्थळ असल्याचे उघड करणारी माहिती

प्रविष्टि तिथि: 26 JUN 2023 10:14PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 जून 2023

 

https://niwrb-gov.org ही एक बनावट वेबसाइट (संकेतस्थळ) असून, या संकेतस्थळावरून राष्ट्रीय पाटबंधारे आणि जलसंपदा मंडळाच्या अंतर्गत प्रशासन अधिकारी, सिंचपाल आणि सिंचपाल पर्यवेक्षक या पदांसाठी भरती करत असल्याचा दावा करण्यात आल्याचे जल शक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान (DoWR, RD &GR) विभागाच्या निदर्शनास आले आहे. 

जल शक्ती मंत्रालयाचा जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान (DoWR, RD &GR) विभाग स्पष्ट करत आहे की उपरोक्त वेबसाइट बनावट आहे आणि राष्ट्रीय सिंचन आणि जल संसाधन मंडळ नावाची कोणतीही संस्था या विभागाशी संबंधित नाही.

जल शक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान (DoWR, RD &GR) विभागाने 22.06.2023 रोजी सायबर गुन्हे  ऑनलाइन पोर्टलवर उपरोक्त बनावट वेबसाइटबाबत पुढील योग्य कारवाईसाठी तक्रार दाखल केली आहे. तसेच,या विभागाने भारतीय कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमला (CERT-In) बनावट वेबसाइट ब्लॉक करण्याची आणि वेबसाइटच्या मालकांवर योग्य कारवाई करण्याची विनंती केली आहे.

* * *

N.Chitale/V.Yadav/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1935494) आगंतुक पटल : 178
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Telugu