मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी नंदी (नवीन औषध आणि लसीकरण प्रणालीसाठी ना हरकत प्रमाणपत्र मान्यता) पोर्टलचा केला प्रारंभ


हा उपक्रम डिजिटल इंडियाला चालना देण्यासाठी आणि पशुधन तसेच पशुधन उद्योगाच्या कल्याणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे: रुपाला

Posted On: 26 JUN 2023 8:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 जून 2023

 

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी आज नवी दिल्लीत कृषी भवन येथे नंदी- नवीन औषध आणि लसीकरण प्रणाली पोर्टलसाठी ना हरकत प्रमाणपत्र मान्यता पोर्टलचा प्रारंभ केला. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या सुगम पोर्टलबरोबर नंदी पोर्टलचे एकत्रीकरण झाल्यामुळे  पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग पारदर्शकतेसह नियामक मंजूरी प्रक्रिया सुलभ करेल तसेच पशुवैद्यकीय उत्पादनांच्या प्रस्तावांचे मूल्यमापन आणि परीक्षण अधिक  सुव्यवस्थित होईल. रुपाला यांनी पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या उल्लेखनीय कार्याची प्रशंसा केली आणि डिजिटल इंडियाला चालना देण्यात आणि पशुधन तसेच  पशुधन उद्योगाच्या कल्याणाच्या दिशेने हा उपक्रम  एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे  अधोरेखित केले. प्राण्यांचे  लसीकरण आणि फिरते पशुवैद्यकीय दवाखाने उपक्रमांनंतर  नंदी पोर्टलचा प्रारंभ हा आणखी एक उल्लेखनीय उपक्रम आहे. हा उपक्रम व्यावसायिक दृष्टीकोनातून संशोधक आणि उद्योगांनाही महत्वपूर्ण सहाय्य पुरवेल.  पशुपालकांमध्ये जागरुकता वाढवून तसेच लॉजिस्टिक सुविधांमध्ये सुधारणा केल्यानंतर औषधांचा वापर वाढेल.

या प्रसंगी,  पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री डॉ. संजीव बालियान  यांनी  हा  विभाग, डिजिटल इंडिया मिशनशी सुसंगत   प्रयत्न करत असल्याबद्दल प्रशंसा केली.

पशुवैद्यकीय लसींचा केवळ प्राण्यांच्या आरोग्यावर आणि उत्पादनावरच नव्हे तर सुरक्षित अन्न पुरवठा वाढल्यामुळे तसेच प्राण्यांकडून मानवापर्यंत संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखल्यामुळे  मानवी आरोग्यावरही मोठा परिणाम झाला आहे आणि होत आहे. हा आपल्या संपूर्ण परिसंस्थेचा  एक भाग आहे. म्हणूनच आपले पशुधन निरोगी ठेवणे आणि लस व औषधांचा नियमित पुरवठा राखणे महत्वाचे आहे.

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1935479) Visitor Counter : 145