श्रम आणि रोजगार मंत्रालय
बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्या हस्ते पाटणा इथे एल-20 बैठकीचे उद्घाटन
Posted On:
22 JUN 2023 8:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जून 2023
बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्या हस्ते आज पाटणा इथे ज्ञान भवनात एल-20 म्हणजेच कामगारविषयक कार्यगटाच्या संकल्पना आधारित कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
यावेळी स्थानिक आणि परदेशी प्रतिनिधींचे स्वागत करतांना आर्लेकर यांनी सांगितले की बिहारच्या भूमीत आज सगळ्यांना बघून मला अभिमान वाटतो आहे. जगातील एकूण लोकसंख्येपैकी 75 टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 28 देशांचे प्रतिनिधी आज या कार्यक्रमात उपस्थित आहेत, असे ते म्हणाले. बिहारला हजारो वर्षांचा अत्यंत गौरवास्पद इतिहासाचा वारसा आहे. ही ज्ञानाची भूमी आहे, हजारो वर्षांपूर्वी, जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथेच असलेल्या नालंदा विद्यापीठात ज्ञानार्जनासाठी येत असत. वैशाली लोकशाहीचे जन्मस्थान आहे. आज आपल्याला मानवी मूल्यांना महत्त्व देण्याची गरज आहे. जर आपण मानवी मूल्यांची जोपासना केली, तर केवळ श्रमिकांचे जग नाही, तर संपूर्ण सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवनही मजबूत होईल, असे ते पुढे म्हणाले.
एल-20 बैठकीचे अध्यक्ष, हिरण्मय पंड्या यांनीही प्रतिनिधींचे स्वागत करताना सांगितले की, केवळ बिहारसाठीच नाही तर उर्वरित देशासाठी आणि कामगार विभागाच्या प्रतिनिधींसाठी ही अभिमानास्पद घटना आहे. ते म्हणाले की एल 20 केवळ जी-20 राष्ट्रांचे नव्हे तर ज्या राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित नाहीत त्यांचेही प्रतिनिधित्व करेल.
* * *
N.Chitale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1934618)
Visitor Counter : 93