उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

योग आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असून अवघ्या मानवतेच्या कल्याणासाठी योग आहे


जबलपूरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांचा सहभाग

भारताच्या प्रयत्नांमुळे योग दिवस हा जागतिक उत्सव बनला - उपराष्ट्रपती

योग हा केवळ एका दिवसासाठी नसून तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे – उपराष्ट्रपती

Posted On: 21 JUN 2023 9:06PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जून 2023 

 

9 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस 2023 मोठ्या प्रमाणात यशस्वीपणे साजरा करण्यात आला. अनेक नवीन उपक्रम यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे वैशिष्ट्य ठरले. मध्यप्रदेशमध्ये जबलपूर येथे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या  मुख्य राष्ट्रीय कार्यक्रमात 15,000 पेक्षा जास्त लोकांनी सीवायपी म्हणजेच ‘कॉमन योग प्रोटोकॉल’ प्रात्यक्षिकात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

उपस्थितांना संबोधित करताना उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले की, आपल्या पंतप्रधानांच्या प्रयत्नांमुळे योग हा आता जागतिक उत्सव बनला आहे, ही समाधानाची बाब आहे. योगसाधना ही केवळ कोणा एका व्यक्तीसाठी नसून संपूर्ण मानवतेसाठी आहे. ते म्हणाले की योगने आता आर्थिक रूप धारण केले आहे आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. आपले प्रशिक्षित योग प्रशिक्षक जगभर काम करत आहेत, आणि योग प्रशिक्षकांची मागणी वाढत आहे.

जग भारतीय संस्कृतीचा स्वीकार आणि अंगिकार करत असल्याने योग परंपरेचा  जागतिक उत्सव ही राष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. योगाभ्यासाचा जगभरात प्रसार करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना अधोरेखित करत  योगाभ्यासामुळे संपूर्ण मानवजातीला अनेक फायदे मिळतात हा संदेश जगाला देण्यात   भारताने  यश मिळवले आहे, असे ते म्हणाले.

मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय आयुष आणि बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय आयुष आणि महिला आणि बालविकास राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई, कॅबिनेट मंत्री, मध्य प्रदेशचे खासदार,  श्रीराम चंद्र मिशनचे अध्यक्ष कमलेश डी. पटेल, मध्यप्रदेश सरकारचे मंत्री आणि आयुष मंत्रालयाचे अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.

उपराष्‍ट्रपतींचे पूर्ण भाषण जाणून घेण्‍यासाठी येथे क्लिक करावे.

https://www.pib.gov.in/PressReleseDetail.aspx?PRID=1933911

 

 

* * *

S.Bedekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1934284)