युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयातर्फे मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर आज "योग महोत्सव"
प्रविष्टि तिथि:
20 JUN 2023 5:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली इथल्या मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर आज दिनांक 20 जून, 2023 रोजी, युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या युवा व्यवहार विभागाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून "योग महोत्सव" आयोजित केला. युवा व्यवहार विभागाच्या सचिव, मीता राजीवलोचन, सहसचिव मनोज सेठी आणि संचालक पंकज कुमार सिंग, या कार्यक्रमाला उपस्थित होते.

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे अधिकारी, एनएसएस, अर्थात राष्ट्रीय सेवा योजना संचालनालय, राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र संघटना, भारतीय क्रीडा प्राधिकरण, राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्था, राष्ट्रीय डोप चाचणी प्रयोगशाळेच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने देखील सामाईक योग प्रोटोकॉलमध्ये भाग घेतला. याव्यतिरिक्त, एनएसएस मधील 100 पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी योग महोत्सव 2023 योग प्रोटोकॉलमध्ये आपला सहभाग नोंदवला.

युवक व्यवहार सचिव, मीता राजीवलोचन यांनी उपस्थितांना संबोधित करताना मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित केले. याव्यतिरिक्त या कार्यक्रमात राजयोग आणि ध्यानाचे फायदे आणि तंत्र’ या विषयावर प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते.‘तसंच मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या योग प्रशिक्षकांनी योग प्रात्यक्षिके सदर केली.

***
N.Chitale/S.Mohite/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1933789)
आगंतुक पटल : 160