उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपती येत्या 22 जूनला जम्मू आणि काश्मीरला भेट देणार 


उपराष्ट्रपती जम्मू विद्यापीठाच्या विशेष दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार

उपराष्ट्रपती जम्मूतील माता वैष्णोदेवी मंदिरात घेणार दर्शन

Posted On: 20 JUN 2023 12:12PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती जगदीप धनखड 22 जून 2023 रोजी जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. हा त्यांच्या पहिलाच दौरा असणार आहे. तिथे  ते जम्मू विद्यापीठाच्या विशेष दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

विशेष दीक्षांत समारंभानंतर, उपराष्ट्रपती माता वैष्णोदेवीच्या पवित्र मंदिरात प्रार्थना करण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी कटरा येथे जातील.

आपल्या दिवसभराच्या दौऱ्यात उपराष्ट्रपती जम्मू-काश्मीर राजभवनालाही भेट देणार आहेत.

***

S.Kane/S.Mohite/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1933596) Visitor Counter : 104