राष्ट्रपती कार्यालय
व्हिएतनामचे संरक्षण मंत्री जनरल फान वेन जिआंग यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली
Posted On:
19 JUN 2023 8:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जून 2023
व्हिएतनामचे संरक्षण मंत्री जनरल फान वेन जिआंग यांनी आज (19 जून 2023) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली.
जनरल जिआंग आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे भारतात स्वागत करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, भारत आणि व्हिएतनाम दरम्यानच्या सांस्कृतिक संबंधाना 2000 वर्षांपेक्षा जास्त काळाचा समृद्ध इतिहास आहे. त्या पुढे म्हणाल्या की, व्हिएतनाम हा भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणाचा प्रमुख आधारस्तंभ असून, हिंद-प्रशांत महासागर क्षेत्र दृष्टिकोनाचा प्रमुख भागीदार आहे. भारत-व्हिएतनाम दरम्यानच्या 'व्यापक धोरणात्मक भागीदारी'ने संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य, व्यापार आणि गुंतवणूक संबंध, ऊर्जा सुरक्षा, विकास सहकार्य, सांस्कृतिक आणि नागरिकांमधील परस्पर संबंध यासह द्विपक्षीय सहकार्याची व्याप्ती वाढवली आहे. द्विपक्षीय संरक्षण सहकार्य हा या भागीदारीच्या सर्वात मजबूत घटकांपैकी एक असल्याचे त्या म्हणाल्या. भारत-व्हिएतनाम संरक्षण प्रतिबद्धतेने, क्षमता विकास, औद्योगिक सहकार्य, शांती प्रक्रिया आणि संयुक्त सराव यासह व्यापक क्षेत्रात प्रवेश केला आहे, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
* * *
N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1933521)
Visitor Counter : 119