संरक्षण मंत्रालय

भारत आणि व्हिएतनाम यांच्यातले संरक्षण सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांची नवी दिल्लीत चर्चा


संरक्षण उद्योग आणि सागरी सुरक्षा या क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर

Posted On: 19 JUN 2023 5:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 जून 2023

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि व्हिएतनामचे संरक्षण मंत्री जनरल फान वेन जियांग  यांनी आज नवी दिल्लीत चर्चा केली. या बैठकीत विविध द्विपक्षीय संरक्षण सहकार्य उपक्रमांवरील प्रगतीचा आढावा घेऊन त्याबाबत समाधान व्यक्त व्यक्त करण्यात आले.

विशेषत: संरक्षण उद्योग, सागरी सुरक्षा आणि बहुराष्ट्रीय सहकार्य या क्षेत्रातले सहकार्य अधिक वाढवण्यासाठीच्या उपाययोजनांविषयी चर्चा करून विविध मार्गांची चाचपणी दोन्ही नेत्यांनी केली. आयएनएस कृपाण ही  स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्र युद्धनौका  (लहान युद्धनौका ) भेट म्हणून व्हिएतनामला देणार असल्याचे यावेळी राजनाथ सिंह यांनी जाहीर केले. हे जहाज व्हिएतनाम पीपल्स नेव्हीच्या ताफ्यात दाखल झाल्यावर त्यांच्या नौदलाच्या क्षमतेत भर पडल्यामुळे हा एक मैलाचा दगड ठरेल.

दौऱ्याचा एक भाग म्हणून व्हिएतनामच्या संरक्षणमंत्र्यांनी, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) मुख्यालयालाही भेट दिली. संरक्षण संशोधन आणि संयुक्त उत्पादनात सहकार्य करून संरक्षण औद्योगिक क्षमता वाढवण्याच्या मार्गांवरही यावेळी चर्चा झाली.

याआधी जियांग  यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन पुष्पचक्र अर्पण केले  आणि शहीद वीरांना आदरांजली  वाहिली. दोन दिवसीय दौऱ्यासाठी  जियांग काल (18 जून रोजी) भारतात दाखल झाले. भारताचे अँक्ट ईस्ट धोरण आणि हिंद -प्रशांत क्षेत्रामध्ये व्हिएतनाम हा महत्त्वाचा भागीदार आहे.

 

* * *

N.Chitale/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1933445) Visitor Counter : 123