संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्रालय आपल्या विभागांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी आणि अधिक चांगल्या शासनाकरीता नव्या संकल्पना समोर आणण्यासाठी दोन दिवसांच्या चिंतन शिबिराचे आयोजन करणार

Posted On: 18 JUN 2023 10:13AM by PIB Mumbai

 

संरक्षण मंत्रालय आपल्या विभागांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी आणि अधिक चांगल्या शासनाकरीता नव्या संकल्पना समोर आणण्यासाठी व्यापक विचारमंथन करणाऱ्या दोन दिवसांच्या चिंतन शिबिराचे नवी दिल्ली येथे 19 आणि 20 जून 2023 रोजी आयोजन करत आहे. संरक्षण विभाग, संरक्षण उत्पादन विभाग, संरक्षण व्यवहार विभाग आणि माजी सैनिक कल्याण विभाग यांनी विविध विषयांची निवड केली असून या विषयांशी संबंधित तज्ज्ञ मंत्रालयातील अधिकाऱ्यांसोबत आपल्या विचारांची देवाणघेवाण या शिबिरात करतील.

संरक्षण विभाग (DoD) खालील विषयांवर चर्चा करेल:

  • राष्ट्रीय सुरक्षेविषयी सर्वसमावेशक दृष्टीकोन
  • सायबर सुरक्षा आव्हाने
  • राष्ट्रीय माहिती सुरक्षा धोरण आणि मार्गदर्शक तत्वे
  • कामगिरीचे लेखापरीक्षण
  • सैनिक शाळा शिक्षण प्रणाली
  • संरक्षण खरेदीत क्षमता उभारणी

 

संरक्षण उत्पादन विभाग

संरक्षण उत्पादन विभाग (DDP) खालील विषयांवर चर्चा करेल:

  • उत्पादन आणि संरक्षण निर्यातीत वाढ करणे
  • आत्मनिर्भरतेमध्ये वाढ करणे: स्वदेशीकरणासाठी समोर असलेला मार्ग
  • औद्योगिक परिसंस्था आणि कुशल मनुष्यबळ
  • समान संधी उपलब्धतेत वाढ
  • दर्जेदार सुधारणा

संरक्षण व्यवहार विभागाने (DMA) मनुष्यबळविषयक पैलूंचे एकात्मिकीकरण आणि व्यवहार्य नियोजन, अधिक समन्वय साधण्यासाठी प्रशिक्षण आणि परिचालनविषयक मुद्दे तसेच धोरणात्मक परिदृश्यांतर्गत संरक्षण दलांचे आधुनिकीकरण आणि क्षमतावृद्धी यांसारख्या अतिशय महत्त्वाच्या विषयांची चर्चेसाठी निवड केली आहे. वसाहतवादी कालखंडापासून सुरू असलेल्या पद्धती आणि कालबाह्य कायदे लक्षात घेण्याच्या आणि त्यांना बाद करण्याच्या उपाययोजना तसेच आपल्या देशाची स्वतःची मूल्ये आणि पद्धतींचा संरक्षण दलांच्या कार्यपद्धतीमध्ये समावेश करणे, यांसारख्या विषयांवर देखील यामध्ये चर्चा होणार आहे.

माजी सैनिक कल्याण विभाग

माजी सैनिक कल्याण विभाग(DESW) खालील विषयांवर चर्चा करणार आहे:

  • माजी सैनिकांना अधिक चांगल्या पेन्शन सुविधा आणि इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा म्हणून ‘SPARSH’ चा अधिक चांगल्याप्रकारे वापर करणे
  • माजी सैनिकांना सूक्ष्म उद्योग सुरू करता यावेत यासाठी त्यांची नियोक्ताक्षमता वाढवून आणि उद्यमशीलतेला प्रोत्साहन देऊन त्यांना पुनर्स्थापित करण्यास मदत करणे.
  • माजी सैनिकांच्या आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करणे.

विविध विभागांमध्ये संघटनात्मक कार्यक्षमता वाढवण्यासाठी नव्या संकल्पना आणि सूचना आमंत्रित करण्यासाठी होणाऱ्या खुल्या चर्चासत्राने या चिंतन शिबिराचा समारोप होईल. आजच्या तारखेपर्यंत साध्य केलेल्या उद्दिष्टांचे प्रत्यक्ष त्याच क्षणाचे (रियल टाईम) लेखापरीक्षण करण्यासाठी आणि वास्तविक कालमर्यादेत निर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एका मार्ग निश्चित करण्यासाठी सरकारच्या निर्देशांनुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

***

S.Pophale/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1933222) Visitor Counter : 197