संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री, व्हिएतनामच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्र्यांशी नवी दिल्लीत 19 जून 2023 रोजी द्विपक्षीय सहयोग मजबूत करण्यासंदर्भात करणार चर्चा
Posted On:
17 JUN 2023 10:01AM by PIB Mumbai
व्हिएतनामचे राष्ट्रीय संरक्षण मंत्री जनरल पान वॅन जियांग 18 ते 19 जून 2023 या कालावधीत भारत भेटीवर येणार आहेत.
भारत आणि व्हिएतनाम यांच्यामधील संरक्षणाच्या बाबतीतील सहयोग पुढे नेण्यासंदर्भात मान्यवर अतिथी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी 19 जून रोजी नवी दिल्ली येथे चर्चा करतील.
दोन्ही पक्ष परस्पर हिताच्या प्रादेशिक तसेच जागतिक घडामोडींवर आपल्या विचारांची देवाणघेवाण करतील. भारतातील आपल्या वास्तव्यादरम्यान व्हिएतनामचे राष्ट्रीय संरक्षण मंत्री आग्रा येथे सांस्कृतिक भेट देतील.
भारत आणि व्हिएतनाम मध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आहे. द्विपक्षीय संरक्षण संबंध हे या भागीदारीचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत.
सेवा क्षेत्रातून स्थापन होणारे विस्तृत संबंध, क्षमता निर्मिती आणि प्रशिक्षण कार्यक्रम तसेच संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेतील सहयोग, नौकांवरील भेटी आणि द्विपक्षीय लष्करी सराव असे विस्तृत पैलू या दोन्ही देशांमधील संरक्षणासंबंधीच्या बंधांना आहेत.
***
Sonal T/Vijaya /CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1933016)
Visitor Counter : 168