कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्टार्टअप्स टिकवण्यासाठी व्यवस्थापन धोरण महत्त्वपूर्ण असून; जम्मू आणि काश्मीर भारतातील कृषी –तंत्रज्ञान स्टार्ट-अप चळवळीचे अग्रणी ठरत आहेत : डॉ जितेंद्र सिंह

Posted On: 16 JUN 2023 5:02PM by PIB Mumbai

 

जम्मू येथील आयआयएम म्हणजेच  भारतीय व्यवस्थापन संस्थेचा  वार्षिक दीक्षांत समारंभाला, केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान, पंतप्रधान कार्यालयकार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी मार्गदर्शन केले. स्टार्टअप्स टिकवण्यासाठी व्यवस्थापन धोरण महत्त्वपूर्ण आहे, असे सांगून जितेंद्र सिंह पुढे म्हणाले  की, जम्मू आणि काश्मीर हे अरोमा मिशनचे (लॅव्हेंडर कल्टिव्हेशन) जन्मस्थान असल्याने त्याचे स्वागत केले जात आहे. हे मिशनच भारतातील कृषी-तंत्रज्ञान  स्टार्टअप चळवळीचे  मशाल वाहक आहे. आणि  आगामी काळात या चळवळीमुळे  भारताच्या अर्थव्यवस्थेमध्‍ये  मूल्यवर्धन होईल, त्यामध्‍ये  उत्तरेकडील आत्तापर्यंत ज्यांचा शोध घेतला गेला नाही, अशा  हिमालयातील स्त्रोतांचा  आणि दक्षिणेकडील  महासागरांतील  स्त्रोतांव्दारे शोध घेतला जाईल.

हे युग नवोन्मेषी संकल्पनांचेनवीन कल्पनांचे युग आहे, असे  डॉ जितेंद्र सिंह यावेळी म्हणालेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील  सरकारकल्पना आणि नवकल्पना  विकसित करण्‍यासाठी आणि त्या टिकून राहतील, यासाठी  सर्व प्रकारचे तांत्रिक तसेच आर्थिक सहाय्य पुरवत आहे.

आज एक लाखाहून अधिक स्टार्ट-अप आणि 100 हून अधिक युनिकॉर्नसह भारत स्टार्ट-अप परिसंस्थेमध्ये आघाडीवर असल्याचे सिंह यांनी सांगितले. आता काही झाले तरी  सरकारी नोकरीच केली पाहिजे, ही  मानसिकता बदलणे नितांत गरजेचे आहे. यामध्‍ये पालक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.

व्यवस्थापन क्षेत्रामधील विद्वान मंडळीच, स्टार्ट-अप परिसंस्थेला सर्वाधिक  टिकावू बनवू शकतात, असे सांगून डॉ. जितेंद्र सिंह म्हणालेआज आयआयएम जम्मूमधून पदवीधर झालेली मंडळी, भारतात प्रगती पथावर  असलेल्या स्टार्ट-अप क्रांतीमध्ये मोठे  योगदान देऊ शकतात.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हा भारतातील शिक्षणाचा पाया आहे असे सांगून डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, आजचे विद्यार्थी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे लाभार्थी  ठरणार आहेत.  नवीन शैक्षणिक धोरण  शिक्षणाच्या सर्व स्तरांवर सार्वत्रिक प्रवेश सुनिश्चित करणारे आहे. असे धोरण  खूप आधीपासूनच लागू व्हायला हवे होते.

डॉ. जितेंद्र सिंह पुढे म्हणाले, जुन्या शैक्षणिक धोरणामुळे देशामध्‍ये  सुशिक्षित बेरोजगार तरुण निर्माण झाले.  परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनईपी 2020’ आता  भूतकाळातील अनेक विसंगती दूर करू शकेल.

डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, आता झापडबंद पद्धतीने काम करण्याचे युग संपले असून संस्थांमध्ये अधिक एकात्मतेची गरज आहे. 2023 चा  युवा  भारत @2047 परिभाषित  करणार आहेत्यांना या काळाची  आव्हाने आणि संधी या दोन्हींचा लाभ घेता येणार येईल.  या नवीन भारतातील युवक  जगातील सर्वोत्तम अर्थव्यवस्थांना मागे टाकून भारत @2047 बनवण्यात मेाठे योगदान देऊ शकणार आहे.

***

S.Kakade/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1932981) Visitor Counter : 132


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu