आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

क्षयरोग (टीबी) निर्मूलनासाठी नाविन्यपूर्ण आरोग्य तंत्रज्ञान कार्यशाळेला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रा एस पी सिंग बघेल यांचे मार्गदर्शन


मोठ्या प्रमाणावर वापर होऊ शकणारी दर्जेदार उत्पादने तयार करावीत असे आवाहन

Posted On: 15 JUN 2023 3:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जून 2023

 

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) आयोजित केलेल्या क्षयरोग (टीबी) निर्मूलनासाठीच्या नाविन्यपूर्ण आरोग्य तंत्रज्ञान कार्यशाळेत, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रा एस पी सिंग बघेल यांनी आज नवी दिल्लीत मार्गदर्शन केले. क्षयरोगासाठी नवनवीन आरोग्य तंत्रज्ञानाच्या मूल्यांकनाला प्रोत्साहित करणे आणि क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात त्यांचा अवलंब करणे हे या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे. वाराणसी येथे आयोजित स्टॉप टीबी शिखर परिषदेत मांडल्या गेलेल्या तंत्रज्ञानासाठीही ही कार्यशाळा एक व्यासपीठ उपलब्ध करून देईल.

सिंग म्हणाले, "2025 पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट पंतप्रधानांच्या राजकीय इच्छाशक्तीचे आणि वचनबद्धतेचे द्योतक आहे. गेल्या काही वर्षांत भारतात क्षयरुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे." मिशनच्या यशासाठी नाविन्यपूर्णता महत्त्वाची आहे असेही त्यांनी सांगितले. तसेच मोठ्या प्रमाणावर वापर होऊ शकेल अशी दर्जेदार उत्पादने तयार करावीत असे आवाहनही त्यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिशील नेतृत्वाखाली, स्वच्छ भारत मिशन या सारख्या केंद्र सरकारच्या कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे पाणी, स्वच्छता आणि स्वच्छता निर्देशकांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. त्यामुळे क्षयरोगाचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे. असे त्यांनी सांगितले. क्षयरुग्ण आता त्यांच्या आयुष्मान भारत कार्डद्वारे उपचार घेऊ शकतात, अशी माहितीही त्यांनी दिली.

क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट केवळ नवकल्पनांच्या आधारेच साध्य होऊ शकते, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.  रोगाचे प्रभावीपणे उच्चाटन करण्यासाठी निदान, उपचार आणि समुदायाचा सहभाग अपरिहार्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

कोणत्याही आरोग्य उपाययोजनांसाठी तंत्रज्ञानाचा अवलंब अपरिहार्य आहेत असे आरोग्य संशोधन विभागाचे सचिव सचिव आणि आयसीएमआरचे महासंचालक डॉ राजीव बहल यांनी सांगितले. आव्हानांवर मात करून केवळ क्षयरोगासाठीच नाही तर भविष्यातील इतर साथीच्या रोगांचा मुकाबला करण्यासाठी तयारी करण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानाच्या आवश्यकतांबद्दल अधिक माहिती देणे हा या कार्यशाळेचा उद्देश आहे असे ते पुढे म्हणाले.

 

 

 

 

S.Patil/P.Jambhekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1932585) Visitor Counter : 146