कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनसीजीजीने प्रतिभावंत तरुणांसाठी खुले केले आपले दरवाजे, सार्वजनिक धोरण आणि सुशासन या संदर्भातील पहिला प्रशिक्षण कार्यक्रम केला सुरू.


एनसीजीजी प्रशिक्षण कार्यक्रमामुळे मुख्य कार्यक्षेत्रात शिक्षण आणि संशोधन सुलभ होणार.

Posted On: 11 JUN 2023 8:13PM by PIB Mumbai

 

भारत सरकारने 2014 मध्ये आघाडीची वैचारिक संस्था म्हणून स्थापन केलेल्या नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स (NCGG) म्हणजेच राष्ट्रीय सुप्रशासन केंद्र या संस्थेने उज्ज्वल तरुण प्रतिभावंतासाठी आपले दरवाजे खुले केले असून आपला पहिला प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात पदव्युत्तर पदवी घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना किंवा कायदा अथवा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात किंवा भारतातील किंवा परदेशातील मान्यताप्राप्त विद्यापीठे/ संस्थांमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून नोंदणी केलेल्या संशोधक बुद्धिवंताना सहभागी होता येणार आहे. इंटर्नशिप कार्यक्रमाचा उद्देश तरुण आणि तल्लख तरुणांना संशोधन, आलोचनात्मक अभ्यास, दस्तऐवजीकरण आणि राष्ट्रीय भांडार विकसित करण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींचा प्रसार करणे तसेच या व्यापक प्रसारासाठी व्यासपीठ स्थापित करणे हे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. यामुळे या तरुण विद्यार्थ्यांना शिकण्याची तसेच सार्वजनिक धोरणात योगदान देण्याची संधी मिळेल. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा किमान कालावधी 8 आठवडे तर कमाल कालावधी 6 महिने आहे. प्रत्येक प्रशिक्षणार्थीला दरमहा दहा हजार रुपये मानधन म्हणून दिले जातील.

एनसीजीजी प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये तरुणांनी प्रचंड रस दाखवला असून जून 2023 च्या तुकडीसाठी आजवर 1,700 हून अधिक अर्ज प्राप्त झाले. या अर्जांमधून छाननी आणि परस्पर संवादानंतर 22 उमेदवारांची त्यांच्या शैक्षणिक आणि अभ्यासक्रमेतर उपलब्धी तसेच सार्वजनिक धोरण, प्रशासन आणि संबंधित कार्यक्षेत्राबद्दलची आवड या निकषांनुसार निवड करण्यात आली आहे. हे निवडले गेलेले तरुण प्रतिभावंत कायदा, विकास अभ्यास, सार्वजनिक आरोग्य, अर्थशास्त्र, भूगोल, राज्यशास्त्र आणि यासारख्या इतर विविध विषयांचे प्रतिनिधित्व करतात. या तरुणांनी आपले शिक्षण हार्वर्ड लॉ स्कूल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, इंडियन स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी आणि नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी यासारख्या नामांकित संस्थांमधून निवडले आहे.

A group of people sitting around a tableDescription automatically generated

एनसीजीजी प्रशिक्षण कार्यक्रम हा एक अल्प-कालिक कार्यक्रम असून तो प्रशिक्षणार्थींना सार्वजनिक धोरण तयार करणे आणि व्यावहारिक अनुभवांचे अद्वितीय मिश्रण प्रदान करतो. कार्यक्रमाच्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक म्हणजे सर्व प्रशिक्षणार्थी त्यांच्या संबंधित कार्यक्षेत्रामधील धोरणावर नाविन्यपूर्ण कल्पना आणि दृष्टिकोनांवर एकत्रित कार्य करू शकतील असे सहयोगी वातावरण तयार करणे, हे आहे.

शिक्षण, विकेंद्रित नियोजन, ई-गव्हर्नन्स, सार्वजनिक सेवा वितरण, कायदे आणि नियम, ग्रामीण विकास आणि दारिद्र्य निर्मूलन, पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य, आरोग्य सेवेतील प्रशासन, शाश्वतता, आपत्ती लवचिकता पायाभूत सुविधा आणि आपत्ती शमन, शाश्वत शहरी व्यवस्थापन आणि शहरी प्रशासन, पायाभूत सुविधांचा विकास, नवोन्मेष आणि नवउद्योजकता, जल संसाधन व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवन, हवामान बदल, पर्यावरण आणि स्वच्छ ऊर्जा, आदिवासी व्यवहार, देखरेख, डेटा विश्लेषण प्रकल्प, डेटा विश्लेषण, डिझाइनिंग, व्यवस्थापन आणि देखरेख, नैसर्गिक संसाधने, पर्यावरण आणि जंगले, जनसंवाद आणि सामाजिक प्रसार माध्यमे आणि प्रशासन क्षेत्रातील इतर संबंधित कार्यक्षेत्र यासारख्या विविध कार्यक्षेत्रांपैकी प्रशिक्षणार्थी आपले कार्यक्षेत्र या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवडू शकतात.

***

R.Aghor/S.Mukhedkar/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1931538) Visitor Counter : 134