मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
मत्स्य खाद्य उद्योगाची शाश्वतता आणि मच्छीमारांची उपजीविका
Posted On:
11 JUN 2023 10:40AM by PIB Mumbai
आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या मत्स्यव्यवसाय विभागानं 9 जून 2023 रोजी ‘मत्स्य खाद्य उद्योगाची शाश्वतता आणि मच्छिमारांची उपजीविका’ या विषयावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले होते. भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे सहसचिव सागर मेहरा आणि डॉ. जे बालाजी या कार्यक्रमाचे सह-अध्यक्ष होते. या कार्यक्रमाला मच्छीमार समाजाचे प्रतिनिधी, निर्यातदार, उद्योजक, मत्स्य व्यवसाय संघटना, मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी, भारत सरकार आणि विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मत्स्यव्यवसाय अधिकारी, राज्य कृषी विद्याशाखा, पशुवैद्यकीय आणि मत्स्यविद्यापीठ, मत्स्य संशोधन संस्था, मत्स्यपालन सहकारी अधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि देशभरातील मत्स्य व्यवसायातील भागधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मत्स्यव्यवसाय विभागाचे सहसचिव सागर मेहरा यांच्या स्वागतपर भाषणाने वेबिनारची सुरुवात झाली. मत्स्यशेतीमध्ये उत्पादित केलेल्या सुमारे 70% मासे आणि क्रस्टेशियन्सना प्रथिनयुक्त खाद्य दिले जाते, ज्यामध्ये मत्स्य खाद्य मुख्य घटक म्हणून कार्य करते. मत्स्य खाद्य हे उच्च दर्जाचे प्रथिने, अत्यावश्यक अमीनो अॅसिड, जीवनसत्त्वे, आवश्यक खनिजे (जसे की फॉस्फरस, कॅल्शियम आणि लोह) आणि इतर वाढीचे घटक असलेले उच्च केंद्रित असे पौष्टिक खाद्य पूरक आहे. त्यातील पौष्टिक मूल्यामुळे, हे शेतातील प्राण्यांच्या आहारातील एक प्राधान्यकृत असे प्रथिने पूरक आहे आणि बहुतेकदा मासे आणि कोळंबीच्या आहारातील प्रथिनांचा प्रमुख स्त्रोत आहे. दरवर्षी मत्स्य खाद्य आणि मत्स्य तेलाचे उत्पादन करण्यासाठी सुमारे 20 दशलक्ष टन कच्चा माल वापरला जातो. याबाबतीत तांत्रिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी सर्व पॅनेल सदस्यांचे स्वागत केले.
कंपाउंड फीड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, सी एल एफ एम ए चे व्यवस्थापकीय समिती सदस्य निसार एफ मोहम्मद यांनी ‘मत्स्य खाद्य उद्योगाचा आढावा’ या विषयावरील चर्चेने तांत्रिक सत्राची सुरुवात झाली. त्यांनी मत्स्य खाद्याचे महत्व आणि उच्च दर्जाच्या मत्स्य खाद्याचे उत्पादन कसे करावे याविषयी माहिती दिली. मत्स्य खाद्य निर्मितीमध्ये माशांच्या उरलेल्या भागांचा वापर केल्याने जलप्रदूषण कमी होते आणि प्राण्यांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढते, त्यामुळे कोकरे आणि पिलांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होते.
भारतीय सागरी घटक संघटना, बंगळुरू चे अध्यक्ष मोहम्मद दाऊद सैत यांनी आपल्या भाषणात मत्स्य खाद्य उद्योग : समस्या आणि आव्हाने याविषयावर मार्गदर्शन केले. मत्स्यव्यवसायाच्या प्रगतीला आणि कल्याणाला चालना देण्याच्या उद्देशाने भारतातील मत्स्य खाद्य उत्पादक आणि मत्स्य तेल उत्पादकांना एका छत्राखाली एकत्र आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे त्यांनी सांगितले.
वर्षानुवर्षे अव्याहतपणे सुरु असणाऱ्या मत्स्य खाद्य आणि कोळंबी खाद्य उद्योगाबद्दल अवंती फीड प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष ए. इंद्र कुमार यांनी माहिती दिली. कोळंबीच्या मत्स्यपालनापैकी 95% निर्यात केली जाते म्हणून सर्व आयातदारांनी शाश्वत मत्स्यपालन पद्धती आणि सागरी विश्वास यांचे पालन करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
वेरावळ येथील मत्स्यपालन तंत्रज्ञान केंद्रीय संस्था, आय सी ए आर चे ज्येष्ठ आणि प्रभारी शास्त्रज्ञ डॉ. आशिष कुमार झा यांनी ‘मत्स्य खाद्य आणि त्याचा पर्यायी सागरी खाद्य उद्योग’ याविषयी माहिती दिली. अनियंत्रित मासेमारी, बायकॅच आणि प्रदूषण या 3 मुद्द्यांबद्दल त्यांनी आपल्या भाषणात भर दिला. मत्स्य खाद्यासाठी पर्याय म्हणून कीटक, पाने, फळे, बिया इत्यादींचा वापर केला जाऊ शकतो, असे त्यांनी सुचवले. भारतीय सागरी मत्स्यव्यवसायामध्ये मासेमारी करताना जाळ्यांमध्ये अडकणाऱ्या पूर्ण वाढ न झालेल्या माशांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे भारतीय कृषी संशोधन परिषद - केंद्रीय सागरी मस्त्य संशोधन संस्था (CMFRI) चे प्रमुख शास्त्रज्ञ, डॉ. ए.पी. दिनेशबाबू यांनी सांगितले आणि मच्छिमारीसाठीच्या जाळीच्या आकाराचे नियमन, जुवेनाईल बायकॅच रिडक्शन डिव्हाइसेस -- पूर्ण वाढ न झालेल्या आणि जाळ्यात अडकलेल्या माशांच्या प्रमाणात (बायकॅच) कपात करण्यासाठी उपकरणे (जेबीआरडी) आणि किमान कायदेशीर आकार (एमएलएस) लागू करण्याची सूचना केली.
सुमारे 12-18% मासे वाया जातात म्हणून मत्स्य उद्योगाला पाठिंबा द्यावा, असे कर्नाटक सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे संचालक रामाचार्य यांनी आवाहन केले. कर्नाटक सरकारने ज्याप्रमाणे अनियंत्रित मासेमारीवर नियमावली लावली आहे त्याचप्रमाणे योग्य धोरणात्मक उपाययोजना आणि नियमनासाठी या विषयावर अनेक व्यासपीठांद्वारे जागरूकता निर्माण केली जात असल्याचे त्यांनी समर्थन केले.
पूर्ण वाढ न झालेले मासे पकडण्याच्या कारणांचा शोध घेण्याचे आणि त्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्व एमएफ च्या सहसचिवांनी अधोरेखित केले. कृत्रिम खडकांच्या स्थापनेने माशांच्या पुनर्भरणासाठी मुख्य भूमिका बजावली पाहिजे ज्यामुळे पूर्ण वाढ न झालेले मासे पकडण्यास प्रतिबंध होईल. त्यानंतर मत्स्य उत्पादक आणि उद्योग प्रतिनिधींनी उपस्थित केलेले प्रश्न आणि शंकांचे निरसन करण्यात आले.
या अंतर्दृष्टीपूर्ण चर्चांसह, पुढील क्षेत्रीय धोरणे आणि कृती योजना विकसित करण्यासाठी पुढील कृती बिंदू प्राप्त केले गेले आहेत. मत्स्यपालन विभागाचे सहाय्यक आयुक्त (वित्तीय), डॉ. एस. के. द्विवेदी, यांनी उपस्थित अध्यक्ष, प्रतिनिधी, अतिथी वक्ते आणि सहभागी यांचे आभार मानल्यास वेबिनारचा समारोप झाला.
****
Nikita J/Bhakti S/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1931444)
Visitor Counter : 219