परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी येथे 11 ते 13 जून 2023 या कालावधीत होणाऱ्या जी20 विकास मंत्र्यांच्या बैठकीचे अध्यक्षपद, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर भूषवणार

Posted On: 10 JUN 2023 5:08PM by PIB Mumbai

 

उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी येथे 11 ते-13 जून 2023 दरम्यान होणाऱ्या जी20 विकास मंत्र्यांच्या बैठकीचे अध्यक्षपद, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर भूषवणार आहेत. भारताच्या जी20 अध्यक्षतेखाली होणाऱ्या या  बैठकीच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष चित्रफीत संदेशाच्या माध्यमातून संबोधित करतील.

विकास साध्य करताना समोर येणाऱ्या वाढत्या आव्हांनाच्या पार्श्वभूमीवर, विकास मंत्र्यांची ही बैठक वाराणसी येथे होत आहे. आर्थिक मंदी, कर्जाचे संकट, हवामान बदलाचे परिणाम, प्रदूषण आणि जैवविविधतेचे नुकसान, वाढती गरिबी आणि असमानता, अन्न आणि ऊर्जा असुरक्षितता, वाढती महागाई, जागतिक पुरवठा-साखळीतील अडथळे आणि भू-राजकीय संघर्ष आणि तणाव अशा आव्हानांचा यात समावेश आहे.

जी20 विकास मंत्रिस्तरीय बैठक ही शाश्वत विकास उद्दिष्टांच्या कामगिरीला गती देण्यासाठीच्या कृतींना एकत्रितपणे सहमती देण्याची आणि विकास, पर्यावरण तसेच हवामानाशी संबंधित उद्दीष्टे अशा विविध आघाड्यांवरील समन्वय वाढवण्याची संधी असेल. त्याचबरोबर विकसनशील देशांच्या प्रगतीला बाधा आणणारे खर्चिक व्यापार टाळण्यावरही लक्ष केंद्रित करता येईल.

भारताने जानेवारी 2023 मध्ये आयोजित केलेल्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ परिषदेच्या अनुषंगाने ही बैठक होत आहे. वाराणसी बैठकीतील निर्णय हे न्यूयॉर्कमध्ये सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांसंदर्भातील शिखर परिषदेलाही पुरक ठरतील. दिल्लीत 6 ते 9 जून दरम्यान झालेल्या चौथ्या आणि अंतिम विकास कार्य गटाच्या (DWG) बैठकीपूर्वी विकास मंत्र्यांची बैठक झाली होती.

या बैठकीत दोन मुख्य सत्रे असतील, एक "बहुपक्षीयता: शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सामूहिक कृती" आणि दुसरे "हरित विकास: ए लाईफ (पर्यावरणस्नेही जीवनशैली) दृष्टिकोन".

पूर्वीच्या जी20 अध्यक्षांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कामांवर आधारित, शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी DWG ने महत्वाची पावले उचलली आहेत.  या अंतर्गत, जी20 चे योगदान वाढवणे, जी 20 च्या दीर्घकालीन दृष्टीकोनाला बळकट करण्यासाठी, शाश्वत, सर्वसमावेशक आणि लवचिक आर्थिक वाढ वृद्धिंगत करण्यासाठी जी20 च्या प्रयत्नांना बळकट करण्याचे आपले प्रयत्न DWG ने पुढे नेले आहेत. 

या बैठकीला एकूण 200 प्रतिनिधी उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. या प्रतिनिधींना जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक असलेल्या वाराणसीच्या समृद्ध संस्कृतीचा आणि परंपरेचा परिचय घडवून देता यावा, यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शने आणि सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.

***

M.Pange/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1931330) Visitor Counter : 153