पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान यांच्याशी दूरध्वनीव्दारे साधला संवाद
उभय नेत्यांनी द्विपक्षीय, बहुपक्षीय आणि विविध जागतिक मुद्द्यांचा घेतला आढावा
सुदानमधील भारतीय नागरिकांना जेद्दाहमार्गे परत आणण्यासाठी सौदी अरेबियाने दिलेल्या मदतीसाठी पंतप्रधानांनी युवराज मोहम्मद बिन सलमान यांचे मानले आभार
पंतप्रधानांनी आगामी हज यात्रेसाठी दिल्या शुभेच्छा
युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी भारताच्या जी 20 अध्यक्षतेला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे केले नमूद
Posted On:
08 JUN 2023 10:07PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलअजीज अल सौद यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण केले.
या नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्याच्या अनेक मुद्द्यांचा आढावा घेतला आणि परस्पर हिताच्या विविध बहुपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाण-घेवाण केली.
सुदानमधून भारतीय नागरिकांना एप्रिल 2023 मध्ये जेद्दाहमार्गे बाहेर काढण्यासाठी सौदी अरेबियाने केलेल्या महत्वपूर्ण सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी युवराज मोहम्मद बिन सलमान यांचे आभार मानले. तसेच त्यांना आगामी हज यात्रेसाठी पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छाही दिल्या.
युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी सध्या सुरू असलेल्या जी- 20च्या भारताच्या अध्यक्षतेला पूर्ण पाठिंबा दर्शविला आणि आपण आगामी काळात होणा-या भारत भेटीसाठी उत्सुक आहोत, असेही त्यांनी सांगितले.
उभय नेत्यांनी संपर्क कायम ठेवण्याविषयी सहमती दर्शवली.
***
SonaliK/SuvarnaB/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1930933)
Visitor Counter : 177
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam