सांस्कृतिक मंत्रालय

आंतरराष्ट्रीय अभिलेखागार दिनानिमित्त उद्या भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार येथे "हमारी भाषा, हमारी विरासत" या प्रदर्शनाचे मिनाक्षी लेखी यांच्या हस्ते उद्‌घाटन

Posted On: 08 JUN 2023 8:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जून 2023

9 जून 2023 रोजी भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार कडून आंतरराष्ट्रीय अभिलेखागार दिन साजरा केला जाणार आहे. या प्रसंगी, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत (AKAM) "हमारी भाषा, हमारी विरासत" या शीर्षकाचे एक प्रदर्शन आयोजित केले जाईल.

उद्या 9 जून 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता भारत सरकारच्या सांस्कृतिक राज्यमंत्री मिनाक्षी लेखी या प्रदर्शनाचे उद्‌घाटन करतील.

या प्रदर्शनात अभिलेखीय भांडाराच्या इतिहासातून काढलेल्या मूळ हस्तलिखितांपैकी काही निवडक हस्तलिखिते सादर केली जातील.जसे की गिलगिट येथील बर्च झाडाच्या सालापासून तयार हस्तलिखिते, तत्वार्थ सूत्र, रामायण आणि श्रीमद भगवद गीता आणि इतर हस्तलिखिते, सरकारच्या अधिकृत फाइल्स, वसाहतवादी शासन काळातील प्रतिबंधित साहित्य, प्रतिष्ठित व्यक्तींची खाजगी हस्तलिखिते, तसेच NAI ग्रंथालयात असलेल्या दुर्मिळ पुस्तकांच्या समृद्ध संग्रहातील हस्तलिखितांचा समावेश आहे.

या प्रदर्शनात जगातील सर्वात प्राचीन - गिलगिट हस्तलिखिते, भारतातील सर्वात जुनी हयात असलेली हस्तलिखिते यांचा समावेश असेल.बर्च झाडाच्या सालीपासून तयार केलेले फोलिओस (बर्च झाडांच्या सालाच्या आतील थराच्या तुकड्यांवर लिहिलेले दस्तऐवज; बर्च झाडाची साल त्याच्या क्षय आणि विघटनाच्या प्रतिकारासाठी ओळखली जाते) मध्ये प्रामाणिक (पवित्र) आणि गैर-प्रामाणिक बौद्ध कामे आहेत जी

संस्कृत, चिनी, कोरियन, जपानी, मंगोलियन, माचू आणि तिबेटी धार्मिक-तात्विक साहित्याची उत्क्रांती अधोरेखित करतात.

एका मतप्रवाहानुसार, हे साहित्य 5व्या-6व्या शतकाच्या दरम्यान लिहिले गेले. गिलगिट हस्तलिखिते गिलगिट प्रदेशातील नौपूर गावात तीन टप्प्यांत सापडली आणि 1931 मध्ये पुरातत्वशास्त्रज्ञ सर ऑरेल स्टीन यांनी प्रथम याबाबत घोषणा केली. हे प्रदर्शन देशभरात बोलल्या जाणार्‍या विविधरंगी भाषांशी संबंधित अभिलेखांच्या विशाल संग्रहाबद्दल माहिती देणारे आहे.

हे प्रदर्शन एक राष्ट्र म्हणून भारताच्या भाषिक विविधतेच्या अनमोल वारशाचे स्मरण करण्याचा एक प्रयत्न आहे.  भारताला  भाषाविविधतेचे विलक्षण वरदान लाभले आहे.  एका अंदाजानुसार जगभरात बोलल्या जाणाऱ्या 7,111 भाषांपैकी 788 भाषा एकट्या भारतात बोलल्या जातात.म्हणून भारताचा समावेश पापा न्यू गिनी, इंडोनेशिया आणि नायजेरियासह जगातील चार भाषिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण देशांपैकी एक देश म्हणून केला जातो.

हे प्रदर्शन 08 जुलै 2023 पर्यंत शनिवार, रविवार आणि राष्ट्रीय सुट्ट्यांसह प्रत्येक दिवशी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00 पर्यंत लोकांसाठी खुले राहील.

 S.Patil/G.Deoda/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1930887) Visitor Counter : 165