कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षात नील अर्थव्यवस्था आणि अवकाश अर्थव्यवस्था यांसारख्या नव्या संकल्पना देशात मांडल्या: केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह

Posted On: 07 JUN 2023 7:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 जून 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9 वर्षात, नील अर्थव्यवस्था आणि अवकाश अर्थव्यवस्थेसारख्या नव्या संकल्पना देशात रुजवल्या आहेत, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पंतप्रधान कार्यालय, कर्मचारी, सार्वजनिक वितरण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.मोदी सरकारची नऊ वर्षे साजरी करण्यासाठी आयोजित एक महिन्याच्या व्यापार संमेलनात ते बोलत होते.

अर्थव्यवस्थेकडे बघण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनामुळे,आज अर्थव्यवस्थेचे सध्याचे स्तंभ अधिक बळकट झाले आहेत, असे डॉ. जितेंद्र सिंग म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या अर्थव्यवस्थेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केवळ चोरी किंवा गैरव्यवहारांवर आला घातला. त्याचवेळी, टाळता येण्यासारखे निर्बंध आणि अनुपालनाचा भार कमी करून अर्थव्यवस्थेच्या स्तंभांना बळकट केले. पूर्वीच्या सरकारांनी ज्याकडे फारसे लक्ष दिले नाही, अशा छोट्या मात्र महत्वाच्या सुधारणा त्यांनी व्यवसाय सुलभतेसाठी अमलात आणल्या, असेही ते म्हणाले.

आपल्या देशाचा अंतराळ विकास प्रवास अमेरिका आणि रशिया या देशांच्या कितीतरी उशिरा सुरु झाला असला, तरीही आज हे देश आपल्या देशातील इस्रो ने विकसित केलेले तंत्रज्ञान त्यांचे उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी वापरत आहेत, ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, असेही जितेंद्र सिंह म्हणाले.

आतापर्यंत भारतातून सोडले गेलेल्या एकूण 385 उपग्रहांपैकी, 353 परदेशी उपग्रह, गेल्या नऊ वर्षात अवकाशात सोडले गेले. आणि त्यातून 174 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स तर युरोपीय उपग्रह प्रक्षेपणातून, 86 दशलक्ष युरो इतकी कमाई झाल्याचे त्यांनी सांगितले.

भारताने सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून इंग्लंडला मागे टाकले असतानाच, त्यांचे उपग्रह प्रक्षेपित करून महसूलही मिळवला आहे, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.

नील अर्थव्यवस्थेशी संबधित खोल समुद्रातील अभियानाबद्दल पंतप्रधानांनी आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात उल्लेख करत, समुद्रात लपलेल्या ह्या खजिन्याविषयी जनजागृती केली, असे त्यांनी सांगितले.

व्यावसायिक समुदायाने व्यवसायाच्या नवीन संस्कृतीशी जुळवून घेण्याचे आणि तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन डॉ जितेंद्र सिंह यांनी केले.

 

 S.Patil/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1930584) Visitor Counter : 187