पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करण्यासाठीचे आमंत्रण स्वीकारले
प्रविष्टि तिथि:
06 JUN 2023 10:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जून 2023
अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करण्यासाठी अमेरिकेच्या संसदेचे प्रवक्ते केविन मॅकार्थी यांनी दिलेले आमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारले आहे. सामायिक लोकशाही मूल्ये, दोन्ही देशांतील जनतेदरम्यान असलेले मजबूत बंध आणि जागतिक शांतता आणि समृद्धता प्रति दोन्ही देशांची अढळ कटिबद्धता यांच्या पायावर भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान उभारलेल्या व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी अभिमानाची भावना व्यक्त केली आहे.
अमेरिकेच्या संसदेचे प्रवक्ते केविन मॅकार्थी यांच्या ट्विट संदेशाच्या उत्तरादाखल पाठवलेल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“मला दिलेल्या सन्माननीय निमंत्रणाबद्दल केविन मॅकार्थी, मिच मॅकॉनेल, चार्ल्स शूमर आणि हकीम जेफ्रीज यांचे मी आभार मानतो.हे आमंत्रण स्वीकारण्यास मला आनंद वाटतो आहे आणि काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करण्यासाठी मी उत्सुक आहे. सामायिक लोकशाही मूल्ये, दोन्ही देशांतील जनतेदरम्यान असलेले मजबूत बंध आणि जागतिक शांतता आणि समृद्धता यांच्या प्रती दोन्ही देशांची अढळ कटिबद्धता यांच्या पायावर उभारलेल्या अमेरिकेसोबतच्या व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारीचा आम्हांला अत्यंत अभिमान आहे.”
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1930330)
आगंतुक पटल : 192
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam