कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारतीय कृषी संशोधन संस्थेची एनआयआरएफ 2023 अंतर्गत कृषी विज्ञानातील उत्कृष्टतेच्या रूपात चमकदार कामगिरी

Posted On: 06 JUN 2023 5:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जून 2023

कृषी आणि संलग्न क्षेत्रांच्या श्रेणी अंतर्गत राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन  (NIRF) 2023 साठीच्या क्रमवारीत, भारतीय कृषी संशोधन संस्था अव्वल ठरली आहे. या संस्थेला पुसा संस्था तसेच हरित क्रांतीचे अग्रदूत म्हणूनही ओळखले जाते. आठव्या राष्ट्रीय संस्थात्मक मानांकनांची  घोषणा परराष्ट्र व्यवहार आणि शिक्षण राज्यमंत्री, डॉ. राजकुमार रंजन सिंग यांनी, 5 जून 2023 रोजी केली. NIRF ने यात सहभागी सुमारे 8,686 उच्च शिक्षण संस्थांची (HEIs)  क्रमवारी जाहीर केली.  या आधी यात चार श्रेणी आणि सात क्षेत्रांचा समावेश होता.  कृषी आणि संलग्न क्षेत्र प्रथमच विषय क्षेत्र म्हणून यात समाविष्ट केले आहेत. 

कृषी संशोधन, शिक्षण आणि याच्या प्रसाराच्या उत्कृष्टतेसाठीची  वचनबद्धता भारतीय कृषी संशोधन संस्थेने  कायम ठेवली आहे. संस्थेने जागतिक विद्यापीठ म्हणून विकसित होण्याच्या दिशेने आधीच मार्गक्रमण सुरु केले आहे. कृषी, समुदाय विज्ञान, बी.टेक (अभियांत्रिकी) आणि बी.टेक (जैवतंत्रज्ञान) या 4 शाखांमध्ये संस्थेने पदवीपूर्व कार्यक्रम सुरू केले आहेत. नवीन शैक्षणिक धोरण 2020 ला अनुसरुन;  व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यासाठी अनेक पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचीही संस्थेची योजना आहे.

 

S.Kane/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 (Release ID: 1930268) Visitor Counter : 113


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu