रेल्वे मंत्रालय

ओदीशा रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटवण्याचे भारतीय रेल्वेचे आवाहन


ओदीशा सरकारच्या मदतीने मृतांची छायाचित्र ,रुग्णालयात दाखल अपघातग्रस्त आणि अद्याप ओळख न पटलेल्या मृतदेहांसंदर्भात माहिती देणारे दुवे उपलब्ध

Posted On: 05 JUN 2023 7:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 जून 2023

ओदीशातील बहनगा येथे झालेल्या दुर्दैवी रेल्वे अपघातातील नातेवाईकांचा  ज्यांना अजूनही ठावठिकाणा माहीत नाही, अशा  लोकांना  शोधण्यासाठी  त्या  कुटुंबीयांच्या सोयीसाठी, ओदीशा सरकारच्या मदतीने भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. या दुर्दैवी अपघातातील पिडीत  प्रवाशांचे कुटुंबीय/नातेवाईक/मित्र आणि हितचिंतक हे खालील तपशील वापरून मृतांचे छायाचित्र , विविध रुग्णालयात दाखल असलेल्या जखमी  प्रवाशांची यादी आणि अनोळखी मृतदेहां संदर्भात माहिती देणाऱ्या  दुव्यांचा  वापर करून  आपल्या व्यक्तींचा  शोध घेऊ  शकतात:

ओदिशातील बहनगा इथल्या दुर्दैवी रेल्वे अपघातातील मृतांच्या छायाचित्रांसाठी दुवा :

https://srcodisha.nic.in/Photos%20Of%20Deceased%20with%20Disclaimer.pdf

वेगवेगळ्या-रुग्णालयांमध्ये -उपचार सुरू असलेल्या-प्रवाशांच्या-यादींचा दुवा :

https://www.bmc.gov.in/train-accident/download/Lists-of-Passengers-Undergoing-Treatment-in-Different-Hospitals_040620230830.pdf

एससीबी  कटक येथे उपचार घेत असलेल्या अज्ञात व्यक्तींसंदर्भात  दुवा :

https://www.bmc.gov.in/train-accident/download/Un-identified-person-under-treatment-at-SCB-Cuttack.pdf

या रेल्वे अपघातग्रस्त   प्रवाशांच्या कुटुंबीयांना/ नातेवाईकांना संपर्क साधण्यासाठी  रेल्वे हेल्पलाइन क्रमांक 139  चोवीस तास कार्यरत आहे.हेल्पलाइन 139 वर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी कार्यरत आहेत. तसेच, बीएमसी  हेल्पलाइन क्रमांक 18003450061/1929 देखील 24x7 सुरु  आहे.महापालिका आयुक्त कार्यालय, भुवनेश्वर यांनी एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे, या नियंत्रण कक्षातून परिस्थितीनुसार लोकांना  संबंधित  रुग्णालय  किंवा शवागारात वाहनांमधून पाठवले जाईल. यासाठी अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.

 

 

 

 

 

 

 

N.Chitale/S.Chavan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1930047) Visitor Counter : 307