अर्थ मंत्रालय

आर्थिक लवचिकतेला बळकट करणे तसेच तसेच ग्लोबल साऊथ देशांमधील समस्यांना वाचा फोडणे या उद्दिष्टांसह गोवा येथे 6 आणि 7 जून 2023 या कालावधीत जी-20 आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थापत्य कृतिगटाच्या तिसऱ्या बैठकीचे आयोजन

Posted On: 05 JUN 2023 5:48PM by PIB Mumbai

पणजी, 5 जून 2023

देशातील चैतन्यमयी राज्य समजल्या जाणाऱ्या गोव्यात येत्या 6 आणि 7 जून  2023 या कालावधीत भारताच्या जी-20 अध्यक्षतेत आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थापत्य कृतिगटाची (आयएफएडब्ल्यूजी) तिसरी बैठक होणार आहे.  

या आयएफए डब्ल्यूजीचे सहअध्यक्षपद भूषवणाऱ्या फ्रान्स आणि कोरिया प्रजासत्ताक या  देशांसह केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली ही दोन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे.

जी-20 सदस्य राष्ट्रे, निमंत्रित देश तसेच विविध आंतरराष्ट्रीय संघटनांचे सुमारे 100 प्रतिनिधी या दोन दिवस चालणाऱ्या बैठकीत सहभागी होण्यासाठी गोव्यात येणार आहेत. या बैठकीदरम्यान जी-20 समूहाच्या भारतीय अध्यक्षतेच्या काळातील अनेक महत्त्वाच्या प्राधान्यक्रम क्षेत्रांचा समावेश असलेली विविध  विषयांची सत्रे  घेण्यात येणार आहेत. यामध्ये इतर अनेक क्षेत्रांसह 21 व्या शतकातील सामायिक जागतिक समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी जागतिक आर्थिक संरक्षक जाळ्याचे सशक्तीकरण (जीएफएसएन), जागतिक कर्जविषयक  असुरक्षिततेच्या समस्येचे समाधान, बहुपक्षीय विकास बँकांचे (एमडीबीज) मध्यवर्ती बँकांच्या डिजिटल चलनांच्या मोठ्या प्रमाणातील आर्थिक परिणामांचे मूल्यमापन करून बळकटीकरण करणे  तसेच शाश्वत भांडवली ओघाच्या माध्यमातून आर्थिक लवचिकतेला मजबूत करणे यांसारख्या विषयांवर ही सत्रे आधारित असतील. जी20 समूहाचा विद्यमान अध्यक्ष म्हणून बैठकीत होणाऱ्या चर्चेदरम्यान जी-20 समूहात प्रतिनिधित्व  नसलेल्या कमी उत्पन्न गटातील आणि विकसनशील देशांतील तसेच जगाच्या दक्षिणेकडील देशांमधील समस्यांना वाचा फोडण्याचा प्रमुख समस्यांवर अधिक भर देऊन त्यावर चर्चा घडवून आणण्याचा भारताचा प्रयत्न असेल

बैठकीच्या पहिल्या दिवशी 6 जून 2023 रोजी, “शिस्तबद्ध हरित स्थित्यंतराच्या दिशेने- गुंतवणूकविषयक गरजा आणि भांडवली ओघाच्या व्यवस्थापनातील जोखीम या विषयावर उच्च स्तरीय चर्चासत्र होणार असून त्यात हरित भांडवली ओघ आणि नव्याने उदयाला येणाऱ्या आर्थिक बाजारांबाबत सखोल चर्चेला वाव देण्यात येईल.विविध आंतरराष्ट्रीय संघटना आणि संस्थांतील अर्थतज्ञ या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत.

या बैठकीच्या अनुषंगाने, गोवा राज्यभरात “लोकसहभागा”वर आधारित  अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये  आर्थिक साक्षरता शिबिरे आणि जागृती मोहिमा, कॉईन मेळा, वॉकेथॉन, स्वच्छता अभियान आणि प्रश्नमंजुषा अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून भारताकडील जी-20 समूहाची अध्यक्षता आणि या अध्यक्षतेच्या काळात भारताने मांडलेली “वसुधैव कुटुंबकम” अर्थात “एक पृथ्वी-एक कुटुंब-एक  भविष्य’” या संकल्पनेबाबत जागृती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्य्त आले आहे.

या बैठकीतील चर्चेबाबत गुजरातमधील गांधीनगर येथे 17 आणि 18 जुलै 2023  रोजी होणाऱ्या जी-20 सदस्य देशांचे अर्थमंत्री आणि प्रमुख बँकांचे गव्हर्नर (एफएमसीबीजी) यांच्या तिसऱ्या बैठकीत माहिती देण्यात येईल.


N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1929978) Visitor Counter : 164


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil