श्रम आणि रोजगार मंत्रालय
जी 20 गटाची 3 री रोजगार कार्य गटाची बैठक जिनेव्हा येथे यशस्वीरीत्या संपन्न, सर्व सदस्यांमध्ये मसुद्यावरील मंत्रिस्तरीय संवाद आणि प्राधान्य क्षेत्राशी संबंधित फलनिष्पत्ती दस्तऐवजांवर व्यापक मतैक्य
Posted On:
02 JUN 2023 9:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जून 2023
भारतीय अध्यक्षतेखालील जी 20 कार्यकाळातील 3 री रोजगार कार्य गटाची (EWG) बैठक आज जिनेव्हा येथे यशस्वीरित्या संपन्न झाली. 31 मे ते 2 जून 2023 या कालावधीत स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथील आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या मुख्यालयात झालेल्या या तीन दिवसीय बैठकीत जी 20 सदस्य देश, आमंत्रित देश, अतिथी देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या 78 प्रतिनिधी सहभागी झाले.
ही बैठक जी 20 रोजगार कार्य गट 2023 च्या प्राधान्य क्षेत्राशी संबंधित फलनिष्पत्ती दस्तावेज आणि मंत्रीस्तरीय मसुद्यावरील सर्व सदस्यांच्या व्यापक मतैक्यासह सकारात्मक वातावरणात संपली.
जी 20 च्या रोजगार कार्य गटाच्या तिसऱ्या बैठकीने भारतीय अध्यक्षतेखाली रोजगार कार्य गट 2023 साठी 03 प्रमुख प्राधान्य क्षेत्रांच्या परिणामांवर एकमत निर्माण करण्याच्या दिशेने एक मोठा टप्पा पार केला. तिसर्या बैठकीचा समारोप अध्यक्षांच्या आभारप्रदर्शनाने झाला, जिथे ही बैठक यशस्वीपणे आयोजित करण्यात योगदान देणाऱ्या सर्व भागधारकांचे विशेषत: आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्र कार्यालयातील भारताचे कायमस्वरूपी मिशन यांचा अध्यक्षांनी आपल्या आभारप्रदर्शनात विशेष उल्लेख केला. रोजगार कार्य गटाची तसेच कामगार आणि रोजगार मंत्र्यांची चौथी आणि शेवटची बैठक 19 ते 21 जुलै 2023 दरम्यान भारतात इंदूर येथे होणार आहे.
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1929529)
Visitor Counter : 182