युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
मिशन ऑलिम्पिक सेल (MOC) ने ऑलिम्पिकपटू इलावेनिल वालारिवन आणि प्रवीण जाधव यांच्या उपकरणांची देखभाल-दुरुस्ती आणि सुधारणा करण्याच्या प्रस्तावांना दिली मान्यता
प्रविष्टि तिथि:
02 JUN 2023 6:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जून 2023
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या (MYAS) मिशन ऑलिम्पिक विभागाने 1 जून रोजी ऑलिम्पिकपटू नेमबाज इलावेनिल वालारिवन आणि तिरंदाज प्रवीण जाधव यांच्या उपकरणांची देखभाल-दुरुस्ती आणि सुधारणा करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे.
या मंजुरीनंतर इलावेनिल तिच्या नेमबाजी उपकरणांच्या सर्व्हिसिंग आणि पेलेट चाचणीसाठी जर्मनीतील वॉल्थर फॅक्टरीत जाणार आहे, तर प्रवीण तिरंदाजी उपकरणांचा दुसरा संच खरेदी करणार आहे जो आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी आवश्यक आहे. स्पर्धेच्या दरम्यान उपकरणे निकामी झाल्यास खेळाडूंना सर्व्हिसिंगसाठी वेळ दिला जात नाही.


मिशन ऑलिम्पिक विभागाने (MOC)ने राष्ट्रकुल पदक विजेत्या श्रीजा अकुलाच्या आर्थिक सहाय्यासाठीच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली आहे. चालू महिन्याच्या शेवटी नायजेरियातल्या लागोस येथे होणाऱ्या डब्ल्यूटीटी (WTT) कंटेडर स्पर्धेत श्रीजा अकुला सहभागी होणार आहे.
टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (TOPS) श्रीजाच्या विमानाचे तिकीट, भोजन, निवास, स्थानिक वाहतूक, व्हिसा खर्च आणि इतर खर्चांसह विमा शुल्कासाठी निधी पुरवेल.
N.Chitale/V.Yadav/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1929451)
आगंतुक पटल : 157