पंतप्रधान कार्यालय
अमृत काळात वंचितांचे सशक्तीकरण
Posted On:
01 JUN 2023 9:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जून 2023
आजच्या काळात झपाट्याने विकसित होत असलेल्या जगात, गरिबी हा जगभरातील सरकारांसाठी एक अतिशय महत्त्वाचा चिंतेचा विषय आहे. भारतासारख्या विकसनशील देशात गरिबी कमी करणे सरकारसाठी आव्हानात्मक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ‘सबका साथ सबका विकास’ या पंतप्रधान मोदी यांच्या ब्रीदवाक्याला अनुसरुन सर्वांच्या सामाजिक कल्याणावर लक्ष केंद्रित केले आहे. कोणीही मागे राहू नये तसेच विकास आणि प्रगतीचे परिणाम आणि फायदे समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचावेत यासाठी सरकारने 2014 पासून,अनेक उपक्रम सुरू केले आहेत. गेल्या नऊ वर्षांत, लक्ष्यित लाभांच्या सार्वत्रिकीकरणासह विविध सरकारी उपक्रमांच्या कार्यक्षम अंमलबजावणीमुळे देशभरात सर्वसमावेशक विकास झाला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधानांच्या संकेतस्थळावरून एक लेख सामायिक केला आहे.
'सबका साथ, सबका विकास' या ब्रीदवाक्याला अनुसरुन आर्थिक समावेशन आणि थेट लाभ हस्तांतरणाद्वारे गरिबी कमी करणे.
#गरीब कल्याणाची 9 वर्षे"
S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1929206)
Visitor Counter : 172
Read this release in:
Punjabi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam