निती आयोग
एटीएल टिंकरप्रेन्योर 2023: साठी नोंदणी करण्याचे अटल नवोन्मेष अभियानाचे आवाहन
Posted On:
01 JUN 2023 7:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जून 2023
नीती आयोगाच्या अंतर्गत असलेल्या अटल नवोन्मेष अभियानाने (एआयएम),‘एटीएल टिंकरप्रेन्योर 2023:’ साठी नोंदणी सुरू केली आहे हे अटल नवोन्मेष अभियानाच्या अटल टिंकरिंग प्रयोगशाळा कार्यक्रमांतर्गत एक प्रमुख उन्हाळी प्रशिक्षण शिबिर आहे.
एटीएल टिंकरप्रेन्योर हे जून जुलैमध्ये आयोजित 7 आठवड्यांचे आभासी माध्यमातून घेण्यात येणारे उन्हाळी प्रशिक्षण शिबीर आहे.हे प्रशिक्षण शिबीराच्या शेवटी विद्यार्थ्यांना स्वतःचा ऑनलाइन उपक्रम तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रमुख डिजिटल कौशल्ये आणि आराखड्याने सुसज्ज करते . यापूर्वी झालेल्या शेवटच्या शिबीरात 5000+ सांघिक नवोन्मेष पाहता आले.त्यापैकी अव्वल 100 जणांना इंडियन स्कूल ऑफ बिझनेसकडून अंतर्वासिता आणि वित्तीय साहाय्य यांसारख्या संधी मिळाल्या.
हे उन्हाळी प्रशिक्षण शिबीर सर्व शाळांमधील (एटीएल आणि बिगर -एटीएल) विद्यार्थ्यांसाठी खुले आहे. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, अंतर्वासिता आणि इतर आकर्षक संधी मिळतील. नोंदणीची अंतिम तारीख 5 जून 2023 आहे
नोंदणीकृत प्रत्येक चमूला नीती आयोगाच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून या शिबिराच्या संपूर्ण कालावधीत समर्पित मार्गदर्शन समर्थन प्रदान केले जाईल.हे प्रशिक्षण शिबीर 8 जूनपासून सुरू होईल आणि 24 जुलैपर्यंत चालेल. विद्यार्थ्यांना 6ऑगस्टपर्यंत प्रवेशिका सादर करता येतील.
प्रत्येक आठवड्यात, विद्यार्थ्यांसाठी डिजिटल कौशल्ये, उत्पादन विकास आणि उद्योजकता कौशल्ये या विषयावर समर्पित तज्ज्ञांची तसेच अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीकोनासाठी प्रोत्साहनपर सत्रे असतील.
या वर्षी प्रादेशिक भाषांमध्ये विशेष पॉडकास्ट, उपाय योजण्यासाठी साप्ताहिक आव्हाने आणि विविध सत्रांमधून बरेच काही शिकायला मिळणार आहे.
या उपक्रमाचा प्रारंभ करताना, अटल नवोन्मेष अभियानाचे अभियान संचालक डॉ. चिंतन वैष्णव म्हणाले, “आम्हा सर्वांसाठी हा एक उत्कंठावर्धक क्षण आहे.आम्ही मागील दोन आवृत्त्यांमध्ये काही हुशारीने साकारलेले नवोन्मेष पाहिले आहेत आणि आम्हाला खात्री आहे की, या वर्षी देखील आम्हाला काही उत्कंठावर्धक नवोन्मेष पाहायला मिळतील.विद्यार्थ्यांसाठी, एटीएल टिंकरप्रेन्योर हे विचार ते अंमलबजावणीपर्यंतचा प्रवास करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आहे”
विद्यार्थी येथे नोंदणी करू शकतात https://kid-ex.com/champions/atltnkr2023
तपशीलवार माहितीपत्रकासाठी, येथे क्लिक करा
https://kid-ex.com/pdf/ATL_Tinkerpreneur_2023_Brochure.pdf
S.Patil/S.Chvan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1929159)
Visitor Counter : 194