ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गेल्या वर्षीच्या एकूण खरेदीला मागे टाकत रब्बी विपणन हंगाम 2023-24 मध्ये आतापर्यंत गव्हाच्या खरेदीने ओलांडला 260 एलएमटीचा टप्पा


मध्यवर्ती भांडारात गहू आणि धानाचा एकत्रित साठा 579 एलएमटीपेक्षा अधिक

सध्याच्या गहू खरेदी दरम्यान हमीभावाने केलेल्या 47,000 कोटी रुपयांच्या खरेदीने 21 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा

Posted On: 01 JUN 2023 5:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 जून 2023

चालू रब्बी विपणन हंगाम (आरएमएस ) 2023-24 दरम्यान गहू खरेदी सुरळीतपणे सुरू आहे.चालू हंगामात गव्हाची  खरेदी उत्तरोत्तर वाढत असून 30.05.2023 पर्यंत  ही खरेदी 262 लाख मेट्रिक टन (एलएमटी ) झाली आहे , सध्याच्या गहू खरेदीने गतवर्षीच्या एकूण 188 एलएमटी खरेदीला 74 एलएमटीने   मागे टाकत   हा टप्पा गाठला आहे. सध्याच्या गहू खरेदी दरम्यान हमीभावाने केलेल्या 47,000 कोटी रुपयांच्या गहू खरेदीने  21 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा   झाला आहे. पंजाब, मध्य प्रदेश आणि हरयाणा या तीन राज्यांचा अनुक्रमे 121.27 एलएमटी, 70.98 एलएमटीआणि 63.17 एलएमटीच्या खरेदीसह गहू खरेदीत मोठा वाटा आहे.

अवकाळी पावसाचा परिणाम गव्हावर झाल्याच्या पार्श्वभूमीवर,गव्हाच्या गुणवत्तेच्या वैशिष्ट्यांमध्ये   भारत सरकारने दिलेली शिथिलता;; गाव/पंचायत स्तरावर सुरु केलेली खरेदी केंद्रे  ; सहकारी संस्था/ ग्रामपंचायती/ अडते  इत्यादी मार्फत खरेदी त्याचप्रमाणे  जास्तीत जास्त गहू उत्पादकांपर्यंत पोहोचण्यासाठी  आधीच अस्तित्वात असलेल्या नियुक्त खरेदी केंद्रांव्यतिरिक्त खरेदी  प्रक्रिया करताना  एफपीओना  संलग्न करण्याची दिलेली परवानगी हे या वर्षीच्या निकोप  खरेदीत महत्त्वाचे योगदान देणारे घटक आहेत.

धान खरेदीही सुरळीत सुरू आहे. खरीप विपणन हंगाम (केएमएस ) 2022-23 मध्ये  खरीप पिकाच्या खरेदी दरम्यान 30.05.2023 पर्यंत 385 एलएमटी  धान खरेदी करण्यात आली  असून अजून 110 एमएमटी धानाची खरेदी बाकी आहे.  खरीप विपणन हंगाम 2022-23 मध्ये रब्बी पिकाच्या खरेदी दरम्यान 106 एलएमटी धान  खरेदी करण्याचा अंदाज आहे.

मध्यवर्ती भांडारामध्ये  गहू आणि धानाचा यांचा एकत्रित साठा 579 एलएमटी  (गहू 312 एलएमटी  आणि तांदूळ 267 एलएमटी ) पेक्षा अधिक आहे यामुळे देशाच्या अन्नधान्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी देश सुस्थितीत  आहे.

S.Thakur/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1929089) Visitor Counter : 180