ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
दरवर्षी मोठ्या संख्येने तरुणांची भरती करून एफसीआय अलिकडच्या वर्षांत बनली अग्रगण्य नियोक्ता
एफसीआय ने 2020 या वर्षात श्रेणी III मध्ये 3,687 अधिकाऱ्यांची, तर 2021या वर्षात श्रेणी II मध्ये 307 अधिकारी आणि श्रेणी I मध्ये 87 अधिकाऱ्यांची केली भरती
एफसीआय ने 2022 मध्ये श्रेणी II आणि III अधिकाऱ्यांच्या 5159 पदांची जाहिरात दिली; ही भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच ती पूर्ण होणार
Posted On:
01 JUN 2023 3:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जून 2023
देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या उपक्रमांपैकी एक असलेली भारतीय खाद्य महामंडळ (FCI) ही संस्था अलीकडच्या काळात दरवर्षी तरुणांची मोठ्या प्रमाणात भरती करत आहे.
एफसीआय ची भरती प्रक्रिया केवळ ऑनलाईन परीक्षेद्वारे पूर्ण केली जाते आणि एम्प्लॉयमेंट न्यूज तसेच आघाडीच्या राष्ट्रीय/ स्थानिक वृत्तपत्रांमध्ये या भरतीची मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली जाते. ही भरती खुल्या स्पर्धेद्वारे केली जाते आणि पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारावर केली जाते.कॉर्पोरेशन / भारत सरकारच्या नियम आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करून अत्यंत पारदर्शकता आणि प्रामाणिकपणे एफसीआय ही भरती सुनिश्चित करते.
विविध श्रेणी (श्रेणी I, II, III आणि IV) अंतर्गत पदांची नियमितपणे जाहिरात केली जात आहे. एफसीआय ने 2020 या वर्षात श्रेणी III मध्ये 3687 अधिकाऱ्यांची तर 2021 मध्ये श्रेणी II मध्ये 307 तसेच श्रेणी I मध्ये 87 अधिकार्यांची यशस्वीपणे भरती केली आहे.
सध्या, एफसीआय ने 2022 मध्ये श्रेणी II आणि III मधील 5159 पदांची जाहिरात दिली आहे. 11.70 लाख उमेदवारांनी भरती प्रक्रियेत भाग घेतला आहे. दोन टप्प्यातील ऑनलाईन परीक्षा यापूर्वीच पूर्ण झाल्या आहेत. शिवाय, भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच ती पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याऐवजी, कार्यक्षम कामकाजासाठी आणि मनुष्यबळाची कमतरता पूर्ण करण्यासाठी भारतीय खाद्य महामंडळ सध्या रिक्त असलेली पदे भरत आहे.
S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1928991)
Visitor Counter : 186