अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

2023-24 या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारच्या खात्यांचा एप्रिल 2023चा मासिक आढावा

प्रविष्टि तिथि: 31 MAY 2023 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 मे 2023 

 

केंद्र सरकारचा एप्रिल 2023 महिन्यासाठीचा जमा खर्च एकत्रित करून त्यासंदर्भातील अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. ठळक मुद्दे खालील प्रमाणे:-

केंद्र सरकारला एप्रिल 2023 साठी 1,70,501 कोटी रूपये प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 1,58,901 कोटी रूपये करातून मिळालेला महसूल (नेट टू सेंटर), 10,958 कोटी रूपये बिगर-कर महसूल आणि 642 कोटी रूपये या कर्जाव्यतिरिक्तची भांडवली प्राप्ती आहे. या भांडवली मिळकतीपैकी 592 कोटी रूपये कर्जाची वसुली आहे आणि 9 कोटीं रूपये विविध भांडवली प्राप्ती आहेत. या कालावधीपर्यंत केंद्र सरकारनं राज्य सरकारांना करातील वाटा म्हणून 59,140 कोटी रूपये दिले आहेत. ते मागील वर्षाच्या तुलनेत11,548 कोटी रूपयांनी जास्त आहेत.

केंद्र सरकारने केलेला एकूण खर्च 3,04,096 कोटी रूपये आहे. त्यापैकी 2,25,639 कोटी रूपये महसूल खात्यातील आणि 78,457 कोटी रुपये भांडवल खात्यातील आहेत. एकूण महसुली खर्चापैकी, 47,929 कोटी रूपये हे व्याजाच्या देयकांच्या खात्यातील आणि 25,161 कोटी रूपये प्रमुख अनुदानाच्या खात्यातील आहेत.

 

* * *

N.Chitale/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1928719) आगंतुक पटल : 156
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Tamil , Bengali , English , Urdu , हिन्दी , Telugu