पोलाद मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

मँगनीज ओर इंडिया लिमिटेडने वित्तीय वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत मँगनीज धातूचे 4.02 लाख टन इतके विक्रमी उत्पादन नोंदवले; गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या उत्पादनापेक्षा 7 टक्के वाढीची नोंद


कंपनी सुरू झाल्यापासून वित्तीय वर्ष 23 मध्ये झालेले हे दुसऱ्या क्रमांकाचे विक्रमी उत्पादन आहे

Posted On: 29 MAY 2023 8:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 मे 2023

 

मँगनीज ओर इंडिया लिमिटेड म्हणजे मॉईलच्या  संचालक मंडळाने 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाही तसेच  आर्थिक वर्षातले  वित्तीय परिणाम मंजूर केले आहेत. वित्तीय वर्ष 2022-23मध्ये एमओआयएलने  4.02 लाख टन इतके मँगनीज उत्पादन नोंदवले असून ही वाढ गेल्या वर्षी याच कालावधीतील उत्पादनापेक्षा 7 टक्क्यांनी जास्त आहे. य़ाच तिमाहीत विक्रीही 3.91 लाख टनापर्यंत  वाढली असून याच कालावधीतील गेल्या वर्षी झालेल्या विक्रीपेक्षा ही वाढ 3 टक्के आहे. इलेक्ट्रोलाईट मँगनीज डाय़ऑक्साईड (इएमडी) चा  विक्रीमहसूलही वार्षिक  आधारावर 48 टक्के वाढला आहे.

कंपनी सुरू झाल्यापासून कंपनीने  वित्तीय वर्ष 23 साठी, दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च उत्पादन नोंदवले आहे. वर्षभरात मँगनीजची विक्री 11.78 लाख टन इतकी झाली असून बाजारपेठीय स्थितीअनुसार वित्तीय वर्ष 22 पेक्षा किंचित कमी विक्री झाली आहे. इएमडीच्या विक्रीची उलाढाल वित्तीय वर्ष 23 मध्ये नव्या उंचीवर पोहचली असून गेल्या वर्षी याच कालावधीपेक्षा 100 टक्के वाढ नोंदवली आहे.

वित्तीय वर्ष 2023 मध्ये कंपनीने विक्रमी भांडवली खर्च 245 कोटी रूपयांचा इतका विक्रमी नोंदवला असून वर्षभरातील निव्वळ नफ्याइतकाच (करोत्तर नफा) तो जवळपास आहे.

याप्रसंगी, एमओआयएलचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक अजितकुमार सक्सेना यांनी कंपनी उच्च वाढ साध्य करण्यासाठी वचनबद्ध असून वित्तीय  वर्ष 24 मध्ये कंपनी दुहेरी अंकातील उत्पादन वाढ साध्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एमओआयएलविषयीः एमओआयएल ही मिनीरत्न  वर्ग 1 मधील अनुसूची अ मधील कंपनी केंद्रीय सार्वजनिक उद्योग असून भारत सरकारच्या पोलाद मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली आहे. एमओआयएल ही देशातील मँगनीज धातू उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी असून बाजारपेठेतील तिचा हिस्सा 45 टक्के आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांत कंपनी 11 खाणींतून उत्पादन काढत आहे.

 

* * *

N.Chitale/U.Kulkarni/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1928150) Visitor Counter : 120