शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान आजपासून तीन दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यावर जाणार- परस्पर संबंध, शिक्षण आणि कौशल्य विकासात सहयोग आणि सहकार्य दृढ करण्यावर देणार भर

Posted On: 28 MAY 2023 3:49PM by PIB Mumbai

 

भारत आणि सिंगापूरदरम्यान सध्या अस्तित्वात असलेले संबंध दृढ करण्यासाठी आणि शिक्षण आणि कौशल्य विकासात द्विपक्षीय सहभागाची व्याप्ती वाढवण्याच्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान आजपासून तीन दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यावर जाणार आहेत.

या भेटीदरम्यान, प्रधान सिंगापूरचे उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री लॉरेन्स वाँग, वरिष्ठ मंत्री थर्मन षणमुगररत्नम, परराष्ट्र मंत्री डॉ. विवियन बालकृष्णन, व्यापार आणि उद्योग मंत्री गॅन किम योंग आणि शिक्षण मंत्री चान चुन सिंग यांच्यासह सिंगापूर सरकारमधील विविध प्रमुख मंत्र्यांची भेट घेणार आहेत.

त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधान, सिंगापूर स्पेक्ट्रा सेकंडरी स्कूल, नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (NTU), इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन अँड एज्युकेशनल सर्व्हिसेस (ITEES), सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड डिझाइन (SUTD) यासह विविध शैक्षणिक संस्थांना भेट देणार आहेत. याचबरोबर ते स्किल्स फ्युचर सिंगापूर (SSG) या सिंगापूर सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या भविष्यातल्या कौशल्य विकास चळवळीच्या अंमलबजावणीला (स्किल्स फ्युचर मुव्हमेंट) चालना देणाऱ्या नोडल एजन्सीशी देखील संवाद साधणार आहेत.

आपल्या  या भेटीदरम्यान धर्मेंद्र प्रधान भारतीय समुदाय आणि ओडिया असोसिएशनच्या सदस्यांना  देखिल भेटणार आहेत, तसेच ते सिंगापूरमधील आयआयटी आणि आयआयएमच्या माजी विद्यार्थ्यांशीही संवाद साधणार आहेत.

भारत आणि सिंगापूर यांच्यात कौशल्य विकास क्षेत्रात दीर्घकालीन भागीदारी आहे. जो भारताच्या G20 अध्यक्षतेखालील शिक्षण कार्य गटाच्या केंद्रित क्षेत्रांपैकी एक असलेल्या आजीवन  शिक्षण आणि कामाच्या भविष्याला चालना देण्याचा एक भाग आहे.

***

S.Patil/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1927896) Visitor Counter : 152