आयुष मंत्रालय
हैदराबाद येथील ‘योग महोत्सवा’मध्ये 50,000 योगप्रेमींचा सहभाग
Posted On:
27 MAY 2023 4:42PM by PIB Mumbai
हैदराबाद येथील एनसीसी परेड ग्राऊंडवर आज झालेल्या ‘योग महोत्सवा’मध्ये जवळजवळ 50,000 रसिकांनी मोठा सहभाग नोंदवला. हा कार्यक्रम मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा (MDNIY) संस्थेने आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन 25 दिवसांवर आल्यानिमित्त आयोजित केला होता.
यावेळी तेलंगणाच्या राज्यपाल डॉ. तमिलिसाई सौन्दराराजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्यकडील प्रदेशाच्या विकास विभागाचे मंत्री(DoNER) जी किशन रेड्डी, केंद्रीय आयुष राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई आदी मान्यवरांनी हा भव्य कार्यक्रम अधिक यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला होता. पद्मभूषण पुरस्कार विजेते आणि प्रख्यात बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक पुलेला गोपीचंद, सिनेअभिनेते विश्वक सेन, कृष्ण चैतन्य यांच्यासह इतर मान्यवर देखील येथील चैतन्यमय वातावरणाचे साक्षीदार होते.
या योग मेळाव्याला संबोधित करताना मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले, योगाने जात, पंथ, लिंग, धर्म या सर्व भेदांना दूर केले आहे. संपूर्ण जगातल्या सर्व वयोगटातील व्यक्तींनी त्यांच्या फायद्यासाठी योगाचा स्वीकार केला पाहिजे. या वर्षा च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची (IDY) ची , संकल्पना सुद्धा अगदी समर्पक आहे - वसुधैव कुटुंबकम साठी योग.
यावेळी बोलताना मंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले, “योग ही भारताच्या समृद्ध वारशाची एक अद्भुत देणगी आहे ज्यामुळे मानवाला सदैव निरोगी आणि सुदृढ ठेवता येऊ शकते.
आपल्या स्वागतपर भाषणात डॉ. मुंजपारा महेंद्र म्हणाले की, “आंतरराष्ट्रीय योग दिन आता जगभरात प्रसिद्ध आहे. आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अथक आणि दूरदर्शी दृष्टिकोनामुळे, योगाचे प्राचीन विज्ञान आता जगभरातील जवळजवळ सर्व राष्ट्रांच्या आरोग्यदायी प्रवासाचा एक भाग बनत चालले आहे.
***
N.Chitale/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1927786)
Visitor Counter : 146