कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
मोदी सरकारने 9 वर्षात उपलब्ध करून दिलेल्या अनेक युवक केंद्री संधींमुळे युवकांसाठी अनेक दालने खुली झाली आहेत: डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
27 MAY 2023 6:55PM by PIB Mumbai
गेल्या नऊ वर्षांत स्टार्टअपमुळे जे मार्ग खुले झाले आहेत त्यामुळे मानसिकता बदलण्याची गरज निर्माण झाली आहे, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. जम्मूतील कठुआ येथे नेहरू युवा केंद्राने आयोजित केलेल्या वाय 20 (युवा उत्सव) ला डॉ जितेंद्र सिंह संबोधित करत होते. इंडिया@2047 ही या महोत्सवाची संकल्पना होती.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची नऊ वर्षे युवाकेंद्री राहिली आहेत, परंतु या देशातील तरुणांसाठी उपलब्ध असलेल्या मार्गांचा आणि विविध उपक्रमांचा इष्टतम वापर करण्यासाठी मानसिक बदलाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
देशातील तरुणांना अनेक संधी खुणावत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार युवकांना विविध स्तरांवर समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी दृढनिश्चयी आणि समर्पित आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतातील स्टार्ट-अप परिसंस्था आता 100 हून अधिक युनिकॉर्नसह जगात तिस-या क्रमांकावर आहे. हे केवळ या देशातील आकांक्षा असलेल्या तरुणांमुळेच शक्य झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे तयार झालेले योग्य आणि आकांक्षी वातावरण पूर्वी नव्हते असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.
युवक हे परिवर्तनाला प्रेरणा देतात आणि भारताचे भविष्य युवक घडवतील कारण भारत हे युवकांचे राष्ट्र आहे ज्याची ताकद युवा शक्तीमध्ये आहे, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धडाडीच्या नेतृत्वामुळे भारताची प्रतिमा बदलली आहे, स्थिर शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून कोणतेही आव्हान हाताळण्यास सक्षम असलेले पंतप्रधान जगातील सर्वात मोठे नेते म्हणून पुढे येत आहेत, असे त्यांनी सांगितले.
***
N.Chitale/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1927766)
Visitor Counter : 168