ग्रामीण विकास मंत्रालय
भूमी संसाधन विभागाचे सचिव अजय तिर्की यांनी जागतिक बँकेच्या मदतीने सुरू असलेल्या ‘रिवॉर्ड’ कार्यक्रमाचा घेतला आढावा
Posted On:
27 MAY 2023 12:42PM by PIB Mumbai
भारत सरकारच्या भूमी संसाधन विभागाचे सचिव अजय तिर्की यांनी नवोन्मेषी विकासाच्या माध्यमातून कृषी प्रतिरोधक्षमतेसाठी पाणलोट पुनरुज्जीवन (REWARD) या जागतिक बँकेच्या मदतीने सुरू असलेल्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.
‘रिवॉर्ड’ हा जागतिक बँकेच्या मदतीने 2021 ते 2026 दरम्यान राबवण्यात येत असलेला पाणलोटक्षेत्र विकास कार्यक्रम आहे. शेतकऱ्यांच्या प्रतिरोधक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी सुधारित पाणलोट व्यवस्थापनाचा अंगिकार करण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्यांच्या संस्थाची क्षमता बळकट करणे आणि सहभागी राज्यांच्या निवड करण्यात आलेल्या पाणलोट क्षेत्रांमध्ये मूल्य साखळीला पाठबळ देणे हा ‘रिवॉर्ड’ या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागात आणि कर्नाटक आणि ओदिशा या राज्यांमध्ये हा कार्यक्रम राबवला जात आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे 4.5 वर्षे कालावधीसाठी 167.71 दशलक्ष डॉलर्स खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये जागतिक बँकेच्या 115 दशलक्ष डॉलरचा[(कर्नाटक 60 दशलक्ष डॉलर), ओदिशा(49 दशलक्ष डॉलर) आणि भूमी संसाधन विभाग( 6 दशलक्ष डॉलर)] दोन्ही सहभागी राज्यांचे 46.71 दशलक्ष डॉलर[कर्नाटक( 25.71 दशलक्ष डॉलर) आणि ओदिशा ( 21.0 दशलक्ष डॉलर)] आणि भूमी संसाधन विभागाच्या 6 दशलक्ष डॉलरचा समावेश आहे. जागतिक बँक आणि राज्ये यांच्यात 70:30 प्रमाणात निधीची विभागणी आहे तर जागतिक बँक आणि भूमी संसाधन विभाग यांच्यात 50:50 प्रमाण आहे.
केंद्रीय पातळीवर ‘रिवॉर्ड’ या कार्यक्रमात व्यवस्थापन, देखरेख, संवाद आणि भूमी संसाधन विभागाकडून ज्ञानाची देवाणघेवाण यांचा समावेश आहे. राज्य पातळीवर ‘रिवॉर्ड’ हा कार्यक्रम WDC-PMKSY 2.0 च्या कक्षेत समाविष्ट असेल आणि प्रमुख विज्ञानाधारित उपक्रम आणि सादरीकरणाच्या अंमलबजावणीला पाठबळ देईल ज्यांचा भारताच्या इतर राज्यांमध्ये WDC-PMKSY 2.0 च्या व्यापक दृष्टीकोनाशी समन्वय साधण्याचा उद्देश आहे.
तिसऱ्या अंमलबजावणी मोहीमेचा एक भाग म्हणून प्रीती कुमार यांच्या नेतृत्वाखालील जागतिक बँकेच्या एका पथकाने भूमी संसाधन विभाग आणि रिवॉर्ड कार्यक्रम सुरू असलेल्या राज्यांना प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील सहा महिन्यांच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी भेट दिली. ही मोहीम पूर्ण झाल्यावर या पथकाने काल भारत सरकारच्या भूमी संसाधन विभागाला या विभागाच्या सचिवांना आयएसएमच्या फलनिष्पत्तीची माहिती देण्यासाठी भेट दिली. रिवॉर्ड या कार्यक्रमाची प्रगती योग्य मार्गावर सुरू असल्याची भावना या पथकाने या भेटीदरम्यान व्यक्त केली आणि या प्रगतीबद्दल भूमी संसाधन विभागाची प्रशंसा केली आणि या कार्यक्रमाच्या वितरणाशी संबंधित मापदंडानुसार प्रगती साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण पाठबळ सुरू ठेवण्याची विभागाच्या सचिवांना विनंती केली.
रिवॉर्ड कार्यक्रमांतर्गत बंगळूरु येथे स्थापन करण्यात आलेल्या पाणलोट विषयक उत्कृष्टता केंद्राला बळकटी देणे, पाणलोट व्यवस्थापनावर विज्ञानाधारित राष्ट्रीय कार्यशाळांचे आयोजन करणे, देशभरात भूमी संसाधन इन्व्हेंटरीचा(LRI) प्रायोगिक तत्वावर विस्तार आणि रिवॉर्ड अधिकाऱ्यांच्या एक्स्पोजर भेटी या मुद्यांचा या बैठकीत झालेल्या चर्चेतील इतर मुद्यांमध्ये समावेश होता.
नीतीन खाडे, संयुक्त सचिव( पाणलोट व्यवस्थापन), डॉ. सी पी रेड्डी वरिष्ठ अतिरिक्त आयुक्त, जागतिक बँकेचे आयएसएम सदस्य, रिवॉर्ड कार्यक्रमाच्या एनपीएमयूचे तज्ञ आणि भूमी संसाधन विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
***
N.Chitale/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1927693)
Visitor Counter : 199