गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

‘मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर’


लाखो नागरिक न वापरलेल्या वस्तू ‘ आर-आर-आर’ केंद्रांवर करत आहेत दान

Posted On: 26 MAY 2023 2:08PM by PIB Mumbai

 

स्वच्छता ही एक अशी सवय आहे जी नागरिकांनी आपली दैनंदिन जीवनशैलीत सामावून घेतली आहे. आर आर आर म्हणजेच रिड्यूस, रियूज, रिसायकल’    हा शहरी स्वच्छतेचा एक अंगभूत भाग आहे. नागरिकांच्या नेतृत्वाखाली  सुरू झालेली मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर’  ही मोहीम आता एका ऐतिहासिक चळवळीत बदलली आहे. देशभरात आतापर्यंत उघडलेली जवळपास 13,000 आरआरआर केंद्रे, 17 लाखांहून अधिक नागरिकांनी स्वेच्छेने त्यांच्या न वापरलेली  जुनी पुस्तके, कपडे, खेळणी अशा विविध वस्तू  दान करीत आहेत. या वस्तूंचे नूतनीकरण केले जाते  आणि पुनर्वापरासाठी योग्य केल्या जातात.  स्वच्छतेसाठी, ही चळवळ  जनआंदोलनात रूपांतर करण्यासाठी नागरिक आणखी जास्त परिश्रम  घेत आहेत.

या आंदोलनामध्ये देशभरात  सर्व स्तरातील नागरिक  योगदान देत आहेत.  यामध्‍ये संगीत वाद्यांपासून ते न वापरलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, जुने  मिक्सर ग्राइंडरपासून ते सायकलपर्यंत, नागरिक या मोहिमेअंतर्गत 3 आरचा मंत्र अंगीकारत उदारपणे त्यांना गरज नसलेल्या वस्तू जमा करत असल्याचे दिसून येते.

कर्नाटकातील नागरिकांनी  जवळच्या आरआरआर  केंद्रात सायकल तर रायपूरमधील लोकांनी गिटार आणि हार्मोनियमसारखी वाद्ये जमा केली. रायपूरमधील 70 वॉर्डांमधून, 1200 नागरिकांनी पहिल्या दिवशी आरआरआर केंद्रामध्ये वस्तू जमा करण्‍यासाठी  योगदान दिले. महिला स्वयंसहाय्यता गट, स्वच्छता दीदी आणि इतर स्वयंसेवी संस्थांही मदतीसाठी या मोहिमेत सहभागी  झाले आहेत.

मध्‍य प्रदेशातील खांडवा येथील विविध महिला गटांनी घरोघरी जाऊन जुने कपडे, बूट आणि इतर उपयोगी  वस्तू गोळा केल्या. आत्तापर्यंत 500 कपडे जमा झाले आहेत. पंजाबच्या माहिलपूरमध्ये, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन परिसरात आरआरआर केंद्र उघडले. गाझियाबादमध्ये, 35 स्वयंसेवा संघटना  आणि 24 निवासी समाज  कल्याण संस्थांनी  एकत्र येऊन शहरातील 5 आरआरआर  केंद्रे चालवण्‍यास सुरूवात केली आहे. कर्नाटकातील जवळपास 450 आरआरआर  केंद्रांना 20,000 हून अधिक नागरिकांनी  भेट दिली आहे. नागरिकांनी वापरलेले प्लास्टिक, कपडे, जुनी पुस्तके, पादत्राणे गोळा केले. महिला बचत गट देखील नागरिकांकडून दान केलेल्यावापरलेल्या कपड्यांमधून पिशव्या बनविण्याचे काम करीत आहेत.  केरळमधील कोझिकोड, त्रिपुरातील खोवाई, पंजाबमधील धुरी, महाराष्ट्रातील नवी मुंबई, गोव्यातील मडगाव आणि इतर अनेक भागातील नागरिक आरआरआर  केंद्रांना न वापरलेल्या वस्तूंचे दान करीत आहेत.

***

N.Chitale/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1927630) Visitor Counter : 97


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu