ऊर्जा मंत्रालय

भारत जुलै 2023 मध्ये गोव्यात G20 ऊर्जा संक्रमण मंत्रिस्तरीय गटाच्या बैठकीबरोबरच 14 वी स्वच्छ ऊर्जा मंत्रीस्तरीय बैठक आणि 8 वी मिशन इनोव्हेशन बैठक आयोजित करणार


स्वच्छ ऊर्जा आणि मिशन इनोव्हेशन बैठकांमध्ये  एकत्रितपणे स्वच्छ ऊर्जा विकसित करण्यासाठी  धोरणे आणि तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्यात येणार

Posted On: 26 MAY 2023 11:31AM by PIB Mumbai

 

गोव्यात 19 ते 22 जुलै 2023 दरम्यान 14वी स्वच्छ ऊर्जा मंत्रीस्तरीय बैठक आणि 8वी मिशन इनोव्हेशन बैठक (CEM14/MI-8)  आयोजित केली जाणार आहे.G20 ऊर्जा संक्रमण मंत्रीस्तरीय गटाच्या बैठकीच्या निमित्ताने  नियोजित स्वच्छ ऊर्जा आणि मिशन इनोव्हेशन बैठकांची संकल्पना  "एकत्रितपणे स्वच्छ ऊर्जा विकसित करणे " अशी आहे. या वर्षीची स्वच्छ ऊर्जा मंत्रिस्तरीय बैठक आणि मिशन इनोव्हेशन  बैठकीनिमित्ताने सरकार, आंतरराष्ट्रीय संघटना , खाजगी क्षेत्र, शिक्षणतज्ञ , नवोन्मेषक नागरी समाज, नवोदित  संशोधक आणि धोरणकर्ते एकत्र येतील. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात उच्च-स्तरीय मंत्री संवादजागतिक उपक्रमांचा प्रारंभ , पुरस्कारांची घोषणा, मंत्री-सीईओ गोलमेज बैठका आणि स्वच्छ ऊर्जा संक्रमणाच्या विविध संकल्पनांवर  आधारित अनेक वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. स्वच्छ ऊर्जा आणि मिशन इनोव्हेशन मध्ये भारत आणि जगभरातील स्वच्छ ऊर्जेतील अत्याधुनिक प्रगतीचे दर्शन घडवणारे  जनतेशी निगडित   तंत्रज्ञानाचे प्रदर्शन देखील असणार आहे.  21 जुलै 2023 रोजी मंत्रीस्तरीय पूर्ण सत्र बैठक होणार आहे तर 22 जुलै रोजी  G20 ऊर्जा संक्रमण मंत्रीस्तरीय बैठक होणार आहे.

"एकत्रितपणे स्वच्छ ऊर्जा विकसित करणे " या संकल्पनेअंतर्गत, उच्च-स्तरीय गोलमेज बैठका , तर कार्यक्रम  आणि तंत्रज्ञान प्रदर्शन संबंधितांना  जगभरात स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान आणि उपायांना चालना देणारी धोरणे आणि कार्यक्रमांच्या विकासाला प्रोत्साहन देऊन स्वच्छ उर्जेच्या वापराला गती देण्यास सक्षम करतील.

काल नवी दिल्लीत ऊर्जा मंत्रालयात आयोजित एका कार्यक्रमात, केंद्रीय ऊर्जा आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी संयुक्तपणे 14 वी स्वच्छ ऊर्जा मंत्रीस्तरीय गटाची बैठक आणि 8व्या मिशन इनोव्हेशन बैठकांसाठी संकेतस्थळ आणि बोधचिन्हचे (लोगो) उदघाटन केले. संकेतस्थळासाठी https://www.cem-mi-india.org/.ला भेट द्या. प्रतिनिधी नोंदणी, कार्यक्रमाची माहिती, वक्त्यांची माहिती, सहभागी आणि सदस्य पोर्टल आणि अन्य  माहिती या संकेतस्थळावर मिळेल.

यापूर्वीच्या  मंत्रिस्तरीय  परंपरेला अनुसरून, या उच्च-स्तरीय कार्यक्रमासाठी एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी, स्वच्छ ऊर्जा आणि मिशन इनोव्हेशन बैठकांचे  यजमान म्हणून भारत सरकारने स्वतंत्र लोगो तयार केला आहे.

संकेतस्थळ आणि लोगोचे उदघाटन करताना उर्जा मंत्री म्हणाले: स्वच्छ ऊर्जा मंत्रिस्तरीय मंच देशाला जागतिक स्वच्छ ऊर्जा समुदायाला एकत्र आणण्याची आणि विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची तसेच स्वच्छ उर्जेच्या संशोधनाचा वापर  करण्याची संधी प्रदान करतो .

ऊर्जा आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणाले की, भारत जगातील सर्वात जलद गतीने नवीकरणीय ऊर्जा क्षमता वाढवत  आहे आणि कोविड-19 महामारीमुळे अडथळे येऊनही ही वाढ सुरूच आहे. उत्सर्जनाची तीव्रता कमी करण्यातही भारत लक्षणीय प्रगती करत आहे, असे ते म्हणाले. "भारत ऊर्जा संक्रमणामध्ये एक नेतृत्व म्हणून उदयाला आला आहे आणि हवामान संबंधी कृतीत अग्रेसर राहण्याचे उद्दिष्ट आहे."

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले: भविष्यात कार्बन उत्सर्जन कमी व्हावे यासाठी भारत वचनबद्ध आहे आणि स्वच्छ ऊर्जा नवोन्मेषाला  गती देऊन देशाच्या ऊर्जा स्थितीत  परिवर्तन घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.  अधिक सुरक्षित आणि शाश्वत भविष्यासाठी एकत्र काम करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. सतत वाढणारी हवामान बदलाची आव्हाने एखादा  देश, संस्था, कंपनी किंवा कोणत्याही वैयक्तिक प्रयत्नांच्या नियंत्रणाबाहेर आहेत."

 

स्वच्छ ऊर्जा मंत्रिस्तरीय गटाची बैठक

स्वच्छ ऊर्जा मंत्रिस्तरीय गटाची (CEM) स्थापना 2009 मध्ये एक उच्च-स्तरीय जागतिक मंच म्हणून करण्यात आली होती ज्याचा उद्देश  स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाला गती देणाऱ्या धोरणे आणि कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे , अनुभव आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे  आणि जागतिक स्वच्छ ऊर्जा अर्थव्यवस्थेच्या संक्रमणास प्रोत्साहन देणे हा होता.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1927477) Visitor Counter : 169