पंतप्रधान कार्यालय
ऑस्ट्रेलियाचे गव्हर्नर- जनरल यांच्याबरोबर पंतप्रधानांची बैठक
Posted On:
24 MAY 2023 11:41AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे गव्हर्नर-जनरल सन्माननीय, डेव्हिड हर्ले यांच्याबरोबर आज, 24 मे 2023 रोजी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील अॅडमिरल्टी हाऊसमध्ये बैठक केली.
यावेळी, पंतप्रधानांनी 2019 मध्ये न्यू साउथ वेल्सचे गव्हर्नर या नात्याने डेव्हिड हर्ले यांनी दिलेल्या भारत भेटीदरम्यान गव्हर्नर-जनरल यांच्याशी झालेल्या बैठकीचे स्मरण करून दिले.
दोन्ही नेत्यांनी दीर्घकालीन द्विपक्षीय भागीदारी मजबूत करण्याबाबत चर्चा केली.
पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाच्या सकारात्मक योगदानाचे आणि दोन्ही देशांना अधिक जवळ आणण्यामध्ये त्यांनी निभावलेल्या भूमिकेचे स्मरण केले.
***
Jaydevi PS/Suvarna/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1926855)
Visitor Counter : 140
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam