आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भोपाळ, भुवनेश्वर, पाटणा, जोधपूर, रायपूर आणि ऋषिकेश येथील सहा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, एम्स मध्ये  सीजीएचएसच्या  सर्व लाभार्थ्यांना रोकडविरहित उपचार सुविधा आता उपलब्ध आहेत.

Posted On: 20 MAY 2023 1:25PM by PIB Mumbai

 

सीजीएचएसच्या  सर्व लाभार्थ्यांना (सेवेत असणारे आणि निवृत्तीवेतनधारक) आता भोपाळ, भुवनेश्वर, पाटणा, जोधपूर, रायपूर आणि ऋषिकेश येथील सहा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, एम्स मध्ये रोकडविरहित उपचार सुविधा उपलब्ध आहेत. सहा एम्स आणि सीजीएचएस यांच्यात आज केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

या उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

सीजीएचएस निवृत्तीवेतनधारक आणि सीजीएचएस लाभार्थ्यांच्या इतर पात्र श्रेणीतील या 6 एम्स मधील बाह्य रुग्ण विभाग, तपासणी आणि अंतर्गत उपचारांसाठी रोकडविरहित उपचारांसाठी पात्र असतील.

ही सर्व एम्स रुग्णालये सीजीएचएस निवृत्तिवेतनधारकांना आणि सीजीएचएस लाभार्थ्यांच्या इतर पात्र श्रेणीतील  क्रेडिट बिले-देयके  सीजीएचएस कडे पाठवतील आणि बिले मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत सीजीएचएस प्राधान्याने देय रक्कम अदा करेल.

सीजीएचएस लाभार्थ्यांना वैध सीजीएचएस लाभार्थी ओळखपत्र सादर  केल्यानंतरच एम्समधील उपचारांसाठी  प्रवेश दिला जाईल.

सीजीएचएस लाभार्थ्यांसाठी एम्स, स्वतंत्र मदत कक्ष आणि स्वतंत्र लेखा प्रणाली तयार करेल.

बाह्य रुग्ण विभागातील उपचारांसाठी किंवा रुग्णांना रुग्णालयामधून सुट्टी दिल्यानंतर एम्स मधील डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे, लाभार्थ्यांना सीजीएचएस मधून संकलित करता येतील.

"नजीकच्या भविष्यात नवी दिल्ली  , चंदीगड पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था आणि पुद्दुचेरी येथील जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था, या एम्स संस्थाचा या करारात समावेश केला जाईल."

सरकारी आणि सीजीएचएस संलग्न केलेल्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची भरती.

सीजीएचएस अंतर्गत लाभार्थ्यांना रुग्णालयातील आंतर रुग्ण विभागात  उपचारांसाठी सीजीएचएसअंतर्गत सूचीबद्ध सरकारी रुग्णालये आणि खाजगी रुग्णालयांचा संदर्भ दिला जातो . सीजीएचएस निवृत्तीवेतनधारक आणि सीजीएचएस लाभार्थ्यांच्या इतर पात्र श्रेणी, संलग्न रुग्णालयांमधील रोकडविरहित सुविधांसाठी पात्र आहेत.

सीजीएचएसकेंद्र सरकारचे कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबातील सदस्यसंसद सदस्य, माजी खासदार आणि लाभार्थ्यांच्या इतर श्रेणींना सर्वसमावेशक आरोग्य सेवा (बाह्य रुग्ण विभाग आणि रुग्ण विभाग दोन्ही) प्रदान करते. सध्या देशातील ७९ शहरांमध्ये सीजीएचएस कार्यरत आहे.

***

Jaydevi PS/B.Sontakke/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1925866) Visitor Counter : 178