दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

'मीटरिंग आणि शुल्क आकारणीवरील मसुदा नियमन' आणि 'दर योजना पडताळणी' वर प्रकाशित झालेल्या बातम्यांवरील भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण, ट्राय चे स्पष्टीकरण

Posted On: 20 MAY 2023 9:58AM by PIB Mumbai

मीटरिंग आणि शुल्क आकारणी पद्धतीच्या अचूकतेविषयी ‘मसुदा नियमनाशी संबंधित  काहीश्या सोप्या नियमांसाठी पुढील मार्ग' या विषयावरील स्पष्टीकरणात्मक टिप्पणी:

प्रस्तावित नियमावली, खरे तर एका वर्षभरात करावयाच्या लेखा परीक्षणाच्या संख्येच्या संदर्भात सेवा प्रदात्यांचा भार कमी करतात. प्रत्येक तिमाहीत प्रत्येक परवानाकृत सेवा क्षेत्राचे (एलएसए) लेखा परीक्षण करण्याऐवजी, वार्षिक आधारावर लेखा परीक्षण प्रस्तावित केले आहे म्हणजे प्रत्येक परवानाकृत सेवा क्षेत्राचे वर्षातून एकदाच लेखा परीक्षण केले जावे (75 टक्के कमी प्रमाण).

प्रत्येक एलएसएपर्यंत पोहोचण्यापेक्षा आणि प्रत्येक योजनेचे वेगळे आणि स्वतंत्र लेखा परीक्षण  करण्यापेक्षा केंद्रीकृत प्रणालीच्या लेखा परीक्षणावर भर देण्यात आला आहे.

आता, एलएसए लेखा परीक्षण केवळ त्या योजनांच्या अधीन केले जाईल जे केंद्रीकृत परीक्षणाच्या अधीन नाहीत.

सेवा प्रदात्यांद्वारे त्रुटी स्वत: सुधारण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.  जर सेवा प्रदात्यांनी वेळेवर सुधारणात्मक कृती केल्या तर त्यांच्यावर कोणतेही आर्थिक निर्बंध लावले जाणार नाहीत. या संदर्भात स्वयं-प्रमाणपत्र लेखा परिक्षणाची आवश्यकता पूर्ण करेल.

सध्या व्यवहारात असलेली लेखा परिक्षणाची पद्धत प्री-पेड ग्राहकांच्या सर्व विभागांचे प्रतिनिधित्व करत नाही, जे एकूण ग्राहकांच्या जवळपास 95 टक्के योगदान देतात. प्रत्येक प्रकारच्या योजनांचे योग्य प्रतिनिधित्व करण्यासाठी दर योजना निवड प्रक्रियेचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे.  मात्र, या प्रकरणात देखील, नमुन्यांचे प्रमाण पूर्वी सारखेच असेल.

बहुतेक सर्व दर योजना या अमर्यादित आधारावर वितरित करण्यात आल्याचे ट्राय ने मान्य केले असले तरी,  प्रत्येक योजनेला वाजवी वापर धोरण (FUP) मर्यादा लागू आहे जी ग्राहकांद्वारे सेवा वापरण्याची गुणवत्ता आणि प्रमाण निर्धारित करते. सेवा प्रदाता आणि नियामकांबद्दल ग्राहकांचा  विश्वास कायम ठेवण्यासाठी, लेखा परीक्षण प्रक्रिया सुरू ठेवणे आवश्यक आहे.

ग्राहकांकडून  अतिरिक्त रक्कम आकारल्याचे लेखा परीक्षणाच्या दरम्यान लक्षात आले तर, ती रक्कम ग्राहकांना त्वरित परत करण्यासाठी सेवा प्रदात्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार, आर्थिक निर्बंधांचा परिणाम देखील सुसंगत केला गेला आहे.

लेखा परीक्षणाद्वारे प्रणालीच्या अचूकतेवर निर्माण झालेला विश्वास सेवा प्रदात्यांवरचा  एल एस ए लेखा परीक्षणाचा भार कमी करेल.

 

'दर योजना पडताळणी' शी संबंधित मुद्द्यावर TRAI चे स्पष्टीकरणात्मक निवेदन:   

प्रचलित नियामक तरतुदींचे पालन सुनिश्चित करण्यासाठी दूरसंचार कंपन्यांनी दाखल केलेल्या शुल्क आकारणी प्रस्तावाची (ऑफर) तपासणी प्राधिकरणाकडून नियमितपणे केली जात आहे.

सन 1999 मध्ये दूरसंचार टॅरिफ ऑर्डर,  टी टी ओ ची स्थापना झाल्यापासून गेल्या अनेक वर्षांपासून शुल्क पद्धतीचे परीक्षण करण्याची प्रक्रिया प्रचलित आहे.

काही विशिष्ट योजना वगळता दूरसंचार कंपन्यांनी दाखल केलेल्या याआधीच्या सर्व टॅरिफ प्लॅन्सची तपासणी करण्यासाठी ट्राय ने कोणतीही विशेष मोहीम हाती घेतलेली नाही.

नियामक तत्त्वांचे पालन न केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्राधिकरणाच्या वैधानिक आदेशानुसार कोणत्याही दराची नव्याने तपासणी केली जाऊ शकते, यामध्ये  दूरसंचार सेवा प्राधान्य, TSP(s) सह कोणत्याही भागधारकाने शुल्काची लूट केल्याच्या आरोपाचा समावेश आहे.

काही टी एस पी  द्वारे कथित लूट केल्याच्या विशिष्ट तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, प्रकरणाची तपासणी केली जाते आणि नियामक तरतुदींनुसार योग्य कारवाई केली जाईल.

***

JaydeviPS/ Bhakti/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1925808) Visitor Counter : 114