संरक्षण मंत्रालय
समुद्र शक्ती-23 या युद्धाभ्यासाची झाली सांगता
Posted On:
20 MAY 2023 10:44AM by PIB Mumbai
भारत-इंडोनेशिया या देशांमधील समुद्र शक्ती-23 या चौथ्या द्विपक्षीय युद्धसरावाचा समारोप दक्षिण चीन समुद्रात झाला.
यासरावाचे आयोजन 17 - 19 मे 2023 या कालावधीत झाले. एएसडब्लू कॉर्व्हेट आयएनएस कावरत्ती हे जहाज , चेतक हेलिकॉप्टर आणि डॉर्नियर मेरीटाइम पेट्रोल एअरक्राफ्ट अर्थात समुद्रावर गस्ती घालणारी विमाने या भारताकडून सहभागी झाले.
इंडोनेशियन नौदलाकडून केआरआय सुलतान इस्कंदर मुडा, हेलिकॉप्टर पँथर आणि सीएन 235 सागरी गस्ती विमानाचा समावेश होता. सामरिक धोरणात्मक कारवाई, तोफगोळ्यांचा भडीमार, हेलिकॉप्टर कार्यान्वयन, हवाई संरक्षण आणि पाणबुडीविरोधी युद्ध सराव यासह अनेक जटिल सराव यावेळी करण्यात आले . यामुळे दोन्ही नौदलांमधील परस्पर कार्यक्षमता वाढली.
सागरी सरावाच्या आधी बंदरावरील सराव टप्पाही फलदायी ठरला. यात व्यावसायिक संवाद, विविध कारवाया आणि क्रीडाउपक्रम देवाणघेवाण यांचा समावेश होता.
सराव समुद्र शक्ती-23 ची यशस्वी सांगता झाली. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील भागीदारी यामुळे अधिक मजबूत झाली. दोन्ही नौदलांनी सहकार्यात्मक सहभागांद्वारे या प्रदेशात शांतता आणि स्थैर्याला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्धत असल्याचे यातून स्पष्ट केले.
***********
Jaydevi/Vinayak/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1925759)
Visitor Counter : 229