कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आज आयोजित करण्यात आलेल्या आठव्या अखिल भारतीय पेन्शन अदालतीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या 50 प्रकरणांवर सुनावणी करण्यात आली आणि आंतर-विभागीय सल्लामसलतीच्या माध्यमातून ही प्रकरणे निकाली काढण्यात आली

Posted On: 17 MAY 2023 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 मे 2023

नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आज आठवी अखिल भारतीय पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली होती. या अदालतीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या 50 प्रकरणांची सुनावणी करण्यात आली आणि आंतर-विभागीय सल्लामसलतीच्या माध्यमातून ही प्रकरणे निकाली  काढण्यात आली.

केंद्रीय निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचे सचिव व्ही.श्रीनिवास यांनी अध्यक्षपद भूषवताना  अशा एक डझन प्रकरणांची दखल घेत संरक्षण, गृह व्यवहार, आरोग्य,नागरी हवाई वाहतूक, टपाल. माहिती आणि प्रसारण, युवक व्यवहार आणि क्रीडा इत्यादी मंत्रालयांकडून या संदर्भात अहवाल मागविले.

व्ही. श्रीनिवास यांनी सांगितले की आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कारण पेन्शन अदालतीसह आज 50व्या निवृत्ती-पूर्व समुपदेशन विषयक कार्यशाळेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक संरक्षणाचे लाभ मिळविणे आणि केंद्र सरकारी आरोग्य सेवा यंत्रणांच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्यसुविधा मिळणे सुनिश्चित करणे या योग्य वेळी निवृत्तीवेतन मिळण्यामागच्या दुहेरी उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी या अदालतीचे आयोजन करण्यात आले असे ते म्हणाले. ते म्हणाले की यावेळेस प्रथमच निवृत्तीवेतन वितरण करणाऱ्या सर्व 18 बँका या कार्यशाळेत सहभागी होऊन त्यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांची माहिती देत आहेत. आगामी 12 महिन्यांमध्ये सर्व केंद्रीय मंत्रालये आणि विभागांतून निवृत्त होऊ घातलेल्या 1200 अधिकाऱ्यांसाठी या 50व्या निवृत्ती-पूर्व समुपदेशन  विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

नवी दिल्ली येथे झालेली ही पेन्शन अदालत देशभरातील 70 ठिकाणी पेन्शनविषयक गुंतागुंतीची प्रकरणे सोडवण्यासाठी याचवेळी आयोजित करण्यात आलेल्या पेन्शन अदालतींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जोडण्यात आली होती.

या वेळी सचिव व्ही. श्रीनिवास म्हणाले की भविष्य प्रणाली हे पोर्टल जगातील सर्वोत्तम पोर्टलपैकी एक असून त्याला एनएएसडीए मूल्यमापन 2021 मध्ये सर्व केंद्र सरकारी ई-प्रशासन सेवा वितरण पोर्टल्समध्ये तिसरे मानांकन मिळाले आहे.

S.Kane/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 




(Release ID: 1924941) Visitor Counter : 124