श्रम आणि रोजगार मंत्रालय

मार्च 2023 मध्ये ईएसआय योजनेंतर्गत 17.31 लाख नव्या कामगारांची भर

Posted On: 15 MAY 2023 9:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 मे 2023

 

ईएसआयसीच्या रोजगारयादीविषयक तात्पुरत्या आकडेवारीनुसार मार्च 2023 या महिन्यात 17.31 लाख नव्या कर्मचाऱ्यांची भर पडली आहे.  

सुमारे 19,000 नव्या आस्थापनांची नोंद झाली आहे आणि त्यांना कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या सामाजिक सुरक्षेच्या छत्राखाली आणून अधिक जास्त व्याप्ती सुनिश्चित केली आहे.

या महिन्यात नोंदणी झालेल्या 17.31 लाख कर्मचाऱ्यांपैकी युवा वर्गाला सर्वात जास्त रोजगार मिळाले असल्याचे देखील या आकडेवारीमधून दिसून येत आहे, ज्यामध्ये 25 वर्षे वयोगटापर्यंतच्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण सर्वात जास्त असून या महिन्यात नोंदणी झालेल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 8.26 लाख  म्हणजे 48% कर्मचारी या वयोगटातील आहेत.  

मार्चच्या रोजगारयादीच्या लिंगनिहाय विश्लेषणानुसार 3.36 लाख महिला कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. त्याशिवाय 41 ट्रान्स्जेंडर कर्मचाऱ्यांची देखील मार्च 2023 मधील ईएसआय योजनेंतर्गत नोंदणी झाली आहे. समाजातील प्रत्येक स्तराला आपले फायदे देण्यासाठी ईएसआयसी वचनबद्ध असल्याचे यातून दिसून येत आहे.

या आकडेवारीमध्ये भर पडण्याची प्रक्रिया सतत सुरू राहात असल्याने ही आकडेवारी तात्पुरती आहे.

 

* * *

S.Kane/S.Patil/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1924339) Visitor Counter : 158