संरक्षण मंत्रालय

हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी स्वीकारला पदभार

Posted On: 15 MAY 2023 5:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 मे 2023

 

एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी आज हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे ते माजी विद्यार्थी असून 6 डिसेंबर 1986 रोजी त्यांची नियुक्ती फायटर स्ट्रीममध्ये करण्यात आली होती. स्टाफ कोर्स, बांगलादेश आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय, नवी दिल्ली इथून त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले.   एअर मार्शल स्वतः एक पात्र उड्डाण प्रशिक्षक तसेच प्रायोगिक चाचणी वैमानिक आहेत. त्यांना लढाऊ, प्रशिक्षक आणि वाहतूक विमानांवर 3300 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे.  त्यांनी सफेद सागर आणि रक्षक या मोहिमांमध्ये भाग घेतला आहे.

पश्चिम क्षेत्रातील आघाडीचा लढाऊ तळ, तसेच प्रमुख लढाई प्रशिक्षण तळ असलेल्या मिराज 2000 स्क्वॉड्रनचे नेतृत्व एअर मार्शल दीक्षित यांनी केले आहे.  त्यांनी यापूर्वी एयर स्टाफ रिक्वायरमेंटचे प्रमुख संचालक, हवाई दलाचे सहाय्यक प्रमुख (प्रकल्प) आणि हवाई मुख्यालयात हवाई कर्मचारी सहाय्यक प्रमुख (योजना)  म्हणून काम केले आहे.  एअर मार्शल दीक्षित हे दक्षिण एअर कमांडचे हवाईदल संरक्षण कमांडर देखील होते आणि हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी ते दक्षिण पश्चिम हवाई कमांडचे वरिष्ठ हवाई कर्मचारी अधिकारी होते.

 

* * *

S.Kane/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1924235) Visitor Counter : 183