अल्पसंख्यांक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सौदी अरेबियामध्ये हज 2023 साठी प्रशासकीय आणि वैद्यकीय कामासाठी प्रतिनियुक्त व्यक्तींचे प्रशिक्षण

Posted On: 13 MAY 2023 4:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 मे 2023

 

केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी आज सौदी अरेबियामध्ये हज 2023साठी हाजींची सेवा करण्यासाठी निवडलेल्या प्रशासकीय आणि वैद्यकीय पथकात प्रतिनियुक्तांसाठी केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने आयोजित केलेल्या प्रशिक्षणाचे उद्घाटन केले. नवी दिल्ली येथील लोधी रोडवर स्कोप कॉम्प्लेक्स सेंटरमध्ये हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

  

काही प्रमुख मुद्यांची आणि सरकारने यावर्षी सुरू केलेल्या काही नव्या उपक्रमांची माहिती खालीलप्रमाणेः

  • भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील द्विपक्षीय करारानुसार यावर्षी हाजींची एकूण संख्या 1.75 लाख
  • बादल्या, बेड शीट, सूटकेस इ.च्या अनिवार्य खरेदीवर होणारा अनावश्यक खर्च कमी करुन सरकारने हज पॅकेजच्या खर्चात कपात करण्यावर विशेष लक्ष पुरवले आहे.
  • प्रत्येक हज यात्रेकरूला 2100 सौदी रियाल देण्याची अनिवार्य तरतूद बंद करून त्यांना त्यांच्या गरजेनुसार सौदी रियाल मिळवण्याची लवचिकता ठेवली आहे.
  • यात्रेकरूंना आपल्या गरजेनुसार परदेशी चलन मिळवण्याच्या लवचिकतेबरोबरच पहिल्यांदाच एसबीआयच्या माध्यमातून इच्छुक यात्रेकरूना परदेशी चलन आणि फॉरेक्स कार्डचा सर्वात जास्त स्पर्धात्मक दरात पुरवठा आणि संपूर्ण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणणे
  • यात्रेकरूंच्या सोयीसाठी आतापर्यंतची सर्वात जास्त यात्राप्रारंभ स्थाने   
  • हज दरम्यान सौदी अरेबियामध्ये  भारतीय यात्रेकरूंचे स्क्रिनिंग, त्यांचे लसीकरण आणि रुग्णालये/ दवाखाने यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि त्यांच्या संस्थांचा थेट सहभाग
  • दिव्यांग आणि वयोवृद्ध यात्रेकरूंसाठी हज धोरणातील विशेष तरतुदींसह समावेशकतेसह आवश्यक ती काळजी.
  • ‘लेडीज विदाऊट मेहरम’ श्रेणीत एकट्या महिलेला अर्ज करण्याची परवानगी देऊन महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन- आतापर्यंतचे सर्वाधिक (4314) अर्ज प्राप्त.
  • तैनात व्यक्तींची निवडः
    • हज यात्रेसाठी एकूण 468 तैनात व्यक्तींची निवड करण्यात आली असून त्यामध्ये 339 वैद्यकीय व्यावसायिक(173 डॉक्टर आणि 166 निमवैद्यकीय),29 प्रथम श्रेणीच्या 29 अधिकाऱ्यांसह 129 व्यक्ती
    • 468  प्रतिनियुक्त व्यक्तींपैकी, 129 महिला सदस्य
    • प्रशासकीय प्रतिनियुक्त व्यक्तींची निवड केवळ सीएपीएफमधूनच( अधिक चांगले व्यावसायिक कौशल्य आणि सौदी अरेबियातील यात्रेकरूंना मदत करण्यासाठी)
    • वैद्यकीय प्रतिनियुक्त व्यक्तींची निवड करण्यासाठी पहिल्यांदाच आरोग्य मंत्रालयाचा सहभाग
    • प्रत्येक राज्यातील  यात्रेकरूंच्या हितरक्षणासाठी प्रत्येक राज्यातून एक राज्य स्तरीय समन्वयक
    • एएचओ आणि एच ए यांची संख्या अंदाजे 300 वरून 108 इतकी करण्यात आली आहे आणि त्यांच्यापैकी 100% अधिकारी आयपीएस अधिकारी आहेत किंवा सीएपीएफ मधील आहेत.  
    • प्रतिनियुक्तीसाठी पहिल्यांदाच अर्ज करणाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.

 

* * *

R.Aghor/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1923890) Visitor Counter : 157


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi , Telugu