खाण मंत्रालय
फेब्रुवारी 2023 मध्ये एकूण खनिज उत्पादनात 4.6% वाढ
एप्रिल-फेब्रुवारी 2022-23 मध्ये 5.7% एकूण वाढ
Posted On:
10 MAY 2023 5:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 मे 2023
फेब्रुवारी, 2023 या महिन्यातील खाण आणि उत्खनन क्षेत्राच्या खनिज उत्पादनाचा निर्देशांक 129.0 नोंदवण्यात आला. (आधार वर्ष : 2011-12=100) हे प्रमाण फेब्रुवारी, 2022 च्या स्तराच्या तुलनेत 4.6% जास्त आहे. भारतीय खाणी ब्युरोच्या (आयबीएम ) तात्पुरत्या आकडेवारीनुसार,एप्रिल-फेब्रुवारी 2022-23 या कालावधीसाठी मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत झालेली एकूण वाढ 5.7 टक्के आहे.
फेब्रुवारी 2023 मध्ये महत्त्वाच्या खनिजांचा उत्पादन स्तर पुढीलप्रमाणे होता : कोळसा 861 लाख टन, लिग्नाइट 41 लाख टन, नैसर्गिक वायू (उपयुक्त ) 2595 दशलक्ष घन. मी., पेट्रोलियम (कच्चे ) 22 लाख टन, बॉक्साइट 1995 हजार टन, क्रोमाईट 330 हजार टन, तांबे 9 हजार टन, सोने 9 किलो, लोह खनिज 245 लाख टन, शिसे 31 हजार टन, मँगनीज धातू 278 हजार टन, झिंक खनिज 144 हजार टन, चुनखडी 336 लाख टन, फॉस्फोराईट 183 हजार टन, मॅग्नेसाइट 10 हजार टन आणि हिरे 17 कॅरेट.
फेब्रुवारी 2023 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत सकारात्मक वाढ दर्शविणाऱ्या महत्त्वाच्या खनिजांमध्ये पुढील खनिजे समाविष्ट आहेत : फॉस्फोराइट (60.2%), कोळसा (8.3%), लोह धातू (7.4%), शिसे खनिज (7.3%), नैसर्गिक वायू (3.2%), झिंक खनिज (1.1%), चुनखडी (0.9%) आणि तांबे धातू (0.5%).
S.Patil/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1923139)
Visitor Counter : 162